मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ६७

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६७

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


ऐसें जे नित्य रमले । एकासीच लिगटले । एकरूप होऊन राहिले । सदा चिंतने तयाच्या ॥७७७॥
ते भक्त म्हणावे एकांति । लौकिकविषयीं नाहीं प्रीति । सर्व काळ आत्मरति । तृप्त होऊनि राहिले ॥७७८॥
तेचि म्हणावे मुख्य भक्त । जे कधीं न होती विभक्त । देवावेगळे कधीं न होत । स्वयें देव जाहले ॥७७९॥
भक्त म्हणवितां देव झाले । परी देवासी न विसरले । देवभक्तपण राखिलें । आजन्म मरणांतीं ॥७८०॥
देवासवें मिळून गेले । देवत्व स्वयें जरी पावले । तरी नवविधा भक्तीचे मार्ग खुले । जगा करूनि दाविती ॥७८१॥
ज्याच्या कृपेनें झाले कृतार्थ । तें ऋण फेडावया यथार्थ । स्वयें आचरोनि साधिला स्वार्थ । परार्थही साधविती ॥७८२॥
कृतकृत्य होऊनि राहिले । आपुलें कार्य सर्व साधिलें । परी तेणें न रहावें उगलें । शिणत राहिले परमार्थीं ॥७८३॥
ज्यांसी स्वयें लाभ जाहला । स्वस्थ न रहावें तयांला । इतरांसी लाभ करवून दिला । तरीच समाधान तयांसी ॥७८४॥
रोगें पीडीला जो नर । तो व्याधि निर्मुक्त जालियावर । सांगावया धांवे सत्वर । इतर रुग्णां उपाय ॥७८५॥
तैसेचिं येथही आहे । भवदु:ख पीडितां दृष्टि पाहे । तरी अंत:करण कळवळोनिये । उध्दाराकारणें तयांच्या ॥७८६॥
मग सद्गादित होऊनि । बोलूं लागे करुणा वचनीं । अज्ञान सर्व हरोनि । मुक्त करी तात्काळ ॥७८७॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP