मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ४४ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४४ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ कामक्रोधमोहस्मृतभ्रंशबुध्दिनाशसर्वनाशकारणत्वात् ॥४४॥ Translation - भाषांतर दु;संगतिचा परिणाम । मनामाजी वाढवी काम । विषय वासनेचा संभ्रम । नित्य करी व्याकुळ ॥४४२॥भोग भोगावे निरंतर । तयालागीं मन आतुर । तेंचि ध्यान धरूनि अंतर । विषयाकार जाहलें ॥४२३॥विषयसुख क्षणभंगुर । तयालागीं भुलले पामर । विसरोनियां अपापर । लुब्ध होऊनि राहती ॥४२४॥इच्छेनुसार भोगप्राप्ति । ऐसें घडे कल्पांतीं । परि वासना अनावर होती । क्षोभ उपजिविती मनासी ॥४२५॥सर्वकाळ तोचि ध्यास । भोग भोगणें हा हव्यास । न मिळतां चित्त उदास । क्रोधाविष्ट त्यागुणें ॥४२६॥क्रोधापरिस शत्रु नाही । घायाळ केले अहिमही । लहानथोर नाडिले पाही । विवेकभ्रष्ट करोनि ॥४२७॥अकल्पित घाला घाली । शाहाण्यासी पाडितो भुली । तेणें मति भांबावली । प्रमादीं करी प्रवृत्त ॥४२८॥तयाचि परि मोह जाण । तेणें असत्यासी सत्यपण । अप्रमाणासी मानिलें प्रमाण । जाहला वंचक सर्वाचा ॥४२९॥तयासी नाहीं लहानथोर । जाणा नेणां करी जर्जर । अर्जुनापरिस भक्त थोर । क्षणांमाजि कवळिलें ॥४३०॥ऐसिया बुध्दिभ्रंशाकरण । स्मृतिभ्रंश मूळ जाण । कर्तव्याकर्तव्याचें विस्मरण । तेणें जाहलें जीवासी ॥४३१॥कोण मी काय करावें । संसारीं कैसें वर्तावें । तें मना नये आघवे । अखंड वृत्ति बर्हिमुख ॥४३२॥विषयावाचून कांही । जगामाजी सुखचि नाहीं । ऐसिये बुध्दिचे प्रवाहीं । पडोनि गेले वाहत ॥४३३॥नाहीं ईश्वराचें स्मरण । धर्माधर्माची ओळखण । पापपुण्याचें विस्मरण । होऊनि ठेलें सर्वकाळ ॥४३४॥याचें नांव स्मृतिभ्रंश । जेथें झाला बुध्दिनाश । तेणेचिं ओढवला सर्वनाश । दुष्टसंगतिस्वभावें ॥४३५॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP