मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र १

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र १

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


आतां करूं भक्ति निरूपण । अधिकारी येथ समस्त जन । सांगोपांग विषयीविवेचन । आत्मोध्दराकारणें ॥४२॥
संसारीं जीव विषयासक्त । मोहपाशीं गुंतले असत । निरंतर दु:ख भोगित । जन्मवरी राहिले ॥४३॥
दु:ख रुचेना कोणासी । परी भोगावें लागे सर्वांशी । कर्मफळ परिपाक यासी । टाळितांही टळेना ॥४४॥
पापकर्मी सहज प्रवृत्ति । तेणें दु:ख भोगप्राप्ति । पुण्यकर्माची वांच्छा न करिती । सुख कैसें होईल ॥४५॥
पुण्यकर्म ईश्वरचरण । पापकर्म तें विस्मरण । श्रुतिशास्त्र पुराणवचन । निर्धार करोनि सांगती ॥४६॥
जग निर्माण ज्यानें केलें । ज्याच्या सत्तेनें सर्व चालिलें । त्यासी आठवितां भले । होय प्राणिमात्राचें ॥४७॥
त्याचे आज्ञेनुसार वर्तन । जे करिती शास्त्रांचे पालन । त्यावरी कृपा परिपूर्ण । नित्य असे तयाची ॥४८॥
तोचि जगाचा मायबाप । त्याचे स्मरणें त्रिविध ताप । निवारती आपेंआप । ऐसा जाणा निश्चय ॥४९॥
स्मरण व्हावया पाहिजे प्रेम । निर्मळ असावें अंतर्याम । दंभ लोभ क्रोध काम । यासी थारा न द्यावा ॥५०॥
तेचि जाणा ईश्वरभक्ति । तिचें निरूपण करावया निरुति । अथ शब्दें आरंभ करिती । नारदमुनी विस्तारें ॥५१॥
अत: म्हणजे यापुढें । भक्तिमार्ग वाडेकोडे । प्राण्यांचे हितार्थ सर्व निवाडे । करूं ऐसी प्रतिज्ञा ॥५२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP