मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| स्तवन श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - स्तवन नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद स्तवन Translation - भाषांतर ॐ नमो सद्गुरु नारदा । सच्चिदानंदा अभयपदा । भक्तिमार्ग रक्षणीं सदा । दक्ष तूंचि सर्वकाळ ॥१॥पूर्वकल्पीं पुण्य घडलें । संत उच्छिष्ट सेविलें । ईश्वरानें आराधिलें । मनोभावें बाळपणीं ॥२॥मातेसी आलें मरण । तेचि मानिला शुभ शकुन । एकांतवास पत्करून । निर्जन वन सिविलें ॥३॥वृक्षाचे ढोलीत सर्वकाळ । ध्यानीं बैसलासी अचळ । व्याघ्र वृश्चिक सर्प व्याळ । सभोवतीं वावरती ॥४॥वयसा तरी येतुलें वरी । परी कवणाचें भय न धरी । अढळ विश्वास अंतरीं । मानिला हरीकृपेचा ॥५॥ध्यान करितां वाढलें बळ । मन उन्मनीं झालें निश्चळ । ईश्वरकृपा सर्वकाळ । अनुभवा येऊं लागली ॥६॥परी प्रत्यक्ष दर्शन घडेना । जीवींची हौस फिटेना । करितांही उपाय नाना । व्याकुळता अंतरीं ॥७॥प्रत्यक्षता झालियावीण । काय करावें वांचून । संतप्त झालें मन निर्वाण । करावया उद्यत ॥८॥ तंव ऐकिली आकाशवाणी । इये जन्मीं अशुध्द योनीं । जन्म झाला याकरणीं । प्रत्यक्ष दर्शन अशक्य ॥९॥परी विश्वास काहीं पटेना । कोण बोलतें कळेना । तीच वाणीं पुन:पुन्हां । तैसेंचि सांगों लागली ॥१०॥मग निश्चय जाहला पाही । मरणावांचुनि सुटका नाहीं । मरण तेंही लवलाही । केव्हां येईल कळेना ॥११॥मरणाची वाट पहातां । मरण कोणासी नये सर्वथा । आपण गाफीलपणे राहतां । येऊनि गांठी तात्काळ ॥१२॥जन्ममरण ईश्वराधीन । उपजे नियमा अनुसरून । कोणाही न चुके या कारण । इच्छा केली न केली सारखी ॥१३॥असो दैवगत्या देहपतन । आकस्मिक झालें जाण । मग ब्रम्हयाचे उदरीं जाऊन । बैसलासी जन्म घ्यावया ॥१४॥पुढलिये कल्पीं जन्मलासीं । नासिकाद्वारे उपजलासी । मानस पुत्र झालासी । स्वयें ब्रम्हदेवाचा ॥१५॥चतुर्दश पुत्र ब्रह्मयाचे । नऊ जण प्रवृत्तिमार्गाचें । पांच जण निवृत्तीचे । जगा जाहले उपदेशी ॥१६॥सनक सनंदन चौघेजण । सनत्कुमार सनातन । पांचवा तूं नारद जाण । उपजत ज्ञानी झालासी ॥१७॥चिरंजीव पद पावलासी । तिन्हीं लोकीं गमन तुजसी । निवृत्तिमार्ग सकल जनांसी । जगीं झालासी दाविता ॥१८॥हातीं चिपुळिया खांदीं विणा । सदा तत्पर ईश्वरभजना । ध्रुव प्रल्हाद व्यासासी जाणा । भक्तिमार्गा लाविलें ॥१९॥ध्रुवाचें वय न पाहिलें । प्रल्हादासी गर्भीं उपदेशिले । ब्रम्हनिष्ठ व्यास भले । भीड न धरिलीं तयांची ॥२०॥ भगवदभक्ती वांचून । जन्मांचे सार्थक नव्हे जाण । ऐसें समस्तांसी जाणवून । तुवां दिधलें निश्चयें ॥२१॥नि:संग नि:स्पृह ह बाणा । स्वयें धरिला आचरणा । देवा दैत्या घरीं जाणा । तुझा मान सारिखाची ॥२२॥ऐसा वंद्य तूं सकळांसी । जगदुध्दारार्थ अवतरलासी । भक्तिमार्ग स्थापावयासी । सदा उद्यत देवराया ॥२३॥देवषिं म्हणती तुजलागीं । देवत्व पावोनि विरागी । स्वच्छंदे डोलतां निजरंगी । कळवळा मनीं जगाचा ॥२४॥कामक्रोधादि षडवर्ग । नाकळती तुझें अंग । भजनकीर्तना माजी दंग । सदा रत स्वस्वरुपीं ॥२५॥जडजीवांचे उध्दारार्थ । अवतार धरिला निश्चित । तेवींचि लोकोपकारार्थ । भक्तिसूत्रें निवेदलीं ॥२६॥त्या सूत्रांचे विवरण । महाराष्ट्र भाषेंकरून । रचावें हा हेतू धरून । पायापाशीं पातलों ॥२७॥वर्हांडातील सुप्रसिध्द संत । गुलाबराव नामें विख्यात । तिहीं या सूत्रींची एक प्रत । प्रेमपूर्वक मज दिधली ॥२८॥तेविचिं मज सांगितलें । यांसी न विसंबितां भले । यांवरि श्रध्दां ठेवितां वहिलें । कल्याण तुमचें करतील ॥२९॥मजवरि श्रध्दां नसो परती । परि या ग्रंथावरी ठेवा निश्चिती । जें पाहिजें तें तुम्हांप्रती ।हा ग्रंथ निश्चये दावील ॥३०॥गुलाबराव संत थोर । अलोट बुध्दीचे सागर । तिहीं पसरोनि कृपाकर । ग्रंथ दाविला मजलागीं ॥३१॥तेथोनिया आजवरी । ग्रंथ सेवा परोपरीं । पठण प्रवचन करोनि अंतरीं । समाधान पावलों ॥३२॥भक्तिमार्गानें विवेचन । करिताती सर्वही जण । परी सांगोपांग विवरण । ऐसें नाहीं देखिलें ॥३३॥शांडिल्यसूत्रेहीं आहाती । परी मज कठिण भासती । ज्ञानाविषय प्रतिपादिती । भाषाही कठिण तयांची ॥३४॥नारदसूत्रें अति मधुर । जैसा अमृताचा निर्झर । श्रवणपठणें प्रीति फार । उपजविती अंतरीं ॥३५॥भाषा तरी अति सुलभ । सहज होय अर्थबोध । लहाना थोरां लागी वेध । श्रवणमात्रें लाविती ॥३६॥मग टीकेचें काय प्रयोजन । ऐसें पुसाल विद्वजन । तरी माझिया मनिंचे समाधान । व्हावया काहीं लिहितसें ॥३७॥आत्मनिवेदनार्थ लेखन । नव्हे पांडित्य प्रदर्शन । किंवा उपदेश करावयालागून । नाहीं पांडित्य जगाशीं ॥३८॥ मजचि माझा उपदेश । व्हावयालागीं सायास । लेखनप्रवचनीं हव्यास । याचिलागीं करीतसें ॥३९॥लेखनीं प्रवचनीं एकाग्रता । मन पावे साम्यावस्था । गूढ अभिप्रायांची स्पष्टता । होऊं लागे आपसया ॥४०॥यालागीं प्रार्थितों । संतचरणा विनवितों । दीनपणें करुणा भाकितों । करा कृपा लवलाही ॥४१॥ N/A References : N/A Last Updated : November 15, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP