मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ७०

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७०

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


तत्पदवाच्य तो शिव । त्वंपदवाच्य तो सामान्य जीव । दोहीं ठायीं ऐक्यभाव । तन्मयता म्हणावी ॥८४१॥
शिव तोचि ईश्वर । सकल जगदाधार । हृदयस्थ तोचि निरंतर । सर्वां ठायीं परिपूर्ण ॥८४२॥
तो जीवांचे हृदयीं । सर्वकाल असून पाही । तयाचें स्मरण त्यां नाहीं । म्हणून राहिला अकळ ॥८४३॥
तयाचें चिंतन नित्य घडेल । चित्त जरी तेथें रमेल । तरीच तें कळों येईल । स्वरूप जाणा तयाचें ॥८४४॥
तयाचें ज्ञान होऊं लागतां । तोचि आपण हें तत्वतां । कळोनि उपजे तन्मयता । ईश्वरत्व जाणावें ॥८४५॥
ईश्वरत्व ओळखों आलें । स्वयें ईश्वर तेचि झाले । सर्व जगा पावन केलें । तिहीं आपुले संगतीं ॥८४६॥
तीर्थाचें तीर्थीकरण । कर्मासी आलें सुकर्मपण । शास्त्रांसी सच्छास्त्रपण । आणितां सहज तयांसी ॥८४७॥
तन्मय पद जें आलें । तेणें ईश्वरत्व सुचविलें । स्वयें ईश्वर होऊनि राहिले । ते जाणावे तन्मय ॥८४८॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP