TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ४६

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४६

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


॥ कस्तरति कस्तिरति मायां य: संगास्त्यजति यो महानुभावं सेवते निर्ममो भवति ॥४६॥
माया म्हणावी ते कैसी । जे नसूनि सर्वाते ग्रासी । बुडतां बुडवी जीवासी । संसार घोर समुद्रीं ॥४४२॥
माया तेचि कल्पना । कल्पनेने संसार रचना । खरी करूनि दाविली जनां । मुळीं नसतां काहींचि ॥४४३॥
कल्पनेपासूनि झाला । जगदभ्रम रूपासी आला । कल्पनाचि आधार त्याला । मिथ्या मोह उपजवी ॥४४४॥स
या कल्पनेविरहित झाला । किंवा मायेपासूनि सोडविला । ऐसा नाहीं कोठें देखिला । संसारी जीव ॥४४५॥
परि ते झालियावीण । नव्हे शाश्वत समाधान । यालागीं सांगति साधन । उपाय परोपरीचे ॥४४६॥
प्रथम करावा संगत्याग । त्यानंतर बोलिला सत्संग । ममता टाकून व्हावें अलग । तरीच माया निरसेल ॥४४७॥
आत्मा स्वरूपत: असंग । परि नेणातियांसी देहसंग । होतांचि ओढवला प्रसंग । दारूण संसार यातनेचा ॥४४८॥
देहात्मबुध्दि जे जडली । तेणें डोळियां झांपड आली । देखत देखत भुली पडली । कर्तव्याकर्तव्याची ॥४४९॥
आत्म्यासी आपलें विस्मरण । हें मूळ मायेचें लक्षण । तेणें दृढ संसारबंधन । बांधोनि घाली जीवासी ॥४५०॥
हें माझें तें माझें । डोईवर घेतलें ओझें । तेणें कष्टी झाले सहजे । आपआपणा विसरोनि ॥४५१॥
गृहदारा पुत्र मित्र । धनसंपत्ति इहपरत्र । भोगसामुग्री रचितां विचित्र । आसक्त केलें सर्वासी ॥४५२॥
तो संग आधीं सांडावा । तरीच मोक्ष पावावा । विषयसंगतिचा गोवा । बिकट आहे ॥४५३॥
विषयसंगतिनें विषयध्यान । जडोनि राहे परिपूर्ण । तेंचि पतनासी कारण । जन्ममरण भोगवी ॥४५४॥
विषयांपासोनि सोडवण । करितील संतसज्जन । यालागीं त्यांचे चरण । नित्य सेवित रहावें ॥४५५॥
संतसंगति करितां । उपदेशाचें श्रवण घडतां । हे माया मोह सरिता । आटूं लागे सत्वर ॥४५६॥
संतसेवा करितां । सहज अनुभव ये हातां । दु:ख शोक मोहवार्ता । दरी पळे ॥४५७॥
माया म्हणजे ममता । हातीं नसोनि मिरवी सत्ता । पदार्थमात्रीं आसक्तता । तेंचि मूळ दु:खासी ॥४५८॥
स्त्री पुत्र गृह धन । हें तो सर्व ईश्वराधीन । असोनि त्यावरी जडलें मन । माझें माझें म्हणविती ॥४५९॥
परि माझें ऐसें काहीच नाहीं । ईश्वरनिर्मित सर्व काही । ऐसे जाणे जो लवलाहीं । तोचि तरेल भवनदी ॥४६०॥
सकल सत्ता ईश्वराची । निर्माण करी सर्व तोचि । ऐसें जाणोनि ममत्वाची । ग्रंथी ज्यानें तोडिली ॥४६१॥
तोचि तरेल भवार्णवीं । ईश्वरार्पणें धन्य पदवी । पावूनि जन्ममरणाच्या चुकवी । यातायाती सकळ ॥४६२॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-11-24T03:05:42.4300000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अनोपाय

 • पु. निरुपाय ; अगतिकत्व . ' प्रस्तुत आमचा अनोपाय झाला आहे .' - पेद २९ . ९५ . ( सं . अन् + उपाय ) 
RANDOM WORD

Did you know?

हल्ली महिला पौरोहित्य करतात हे धर्मसंमत आहे काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.