TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ४७

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४७

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


॥ यो विविक्तस्थानं सेवते यो लोकबन्धमुन्मूल यति निस्त्रैगुण्यो भवति यो योगक्षेमं त्यजति ॥४७॥
माया म्हणजे प्रपंचरचना । विविध विश्वाची भावना । विश्वरूपें भुलवी जना । नाना प्रकार दावोनि ॥४६३॥
जें जें काहीं दिसे बाहेरी । त्याचें प्रतिबिंब उठे अंतरीं । कल्पना उपजोनि नानापरी । व्याकुळ करी समस्तां ॥४६४॥
कल्पनेआंतून कल्पना । नानाविध उठती जाणा । क्षणभरही स्थिरता मना । नये कोणीही आणितां ॥४६५॥
मन स्थिर झालियावीण । नव्हेचि आत्मस्वरूपज्ञान । ज्ञानावांचून संतरण । कदा नोहे मायेचें ॥४६६॥
माया तेचि कल्पना । कल्पना तेचि माया जाणा । कल्पनारहित स्थिति आणा । अनुभवासी आपुल्या ॥४६७॥
ऐसी या कल्पनेचि निवृत्ति । व्हावया बाह्य विषयसंगति । सांडूनि एकांत सेवन बोलती ।निश्चय उपास तयासी ॥४६८॥
एकांत सेवन केलिया । इंद्रिया कवाड पडलिया । अभ्यासमार्गीं प्रवर्तलिया । स्थिर मन होय सावकाश ॥४६९॥
नित्य एकांत सेवन । संयमावरी दृढमन । करोनि रहावें सावधान । आत्मनिश्चियीं सर्वकाळा ॥४७०॥
तेवीचिं लोक काय बोलती । वंदिती अथवा निंदिती । मना आणों नये निश्चिती । राखावी आत्मविश्वासी ॥४७२॥
ईश्वराज्ञा प्रमाण । मानावें शास्त्रवचन । साधु सत्पुरुष संत सज्जन । सांगतील तें ऐकावें ॥४७३॥
व्यर्थ पडों नये भरीं । लौकिक संभाळणें कठिण भारी । निंदा अपवाद सांडूनि दूरी । लक्ष लावावें परमार्थीं स॥४७४॥
ऐसा निग्रह घडेल । तरीच स्वहित साधेल । लौकिक राखों जातां नासेल । ऐहिक्य तैसें परत्र ॥४७५॥
लौकिक कोणाही राखवेना । निंदा अपवाद चुकेना । थोराथोरांसी यातना । कां लागल्या भोगाव्या ॥४७६॥
सत्पुरुष बहुत झाले । थोर पदवीस पावले । जिहीं लौकिक विचार सांडिले । सावधानपणें निरंतर ॥४७७॥
आतां सत्वरजतमोवृत्ति । अंत:करणीं सदैव वसती । त्यांची सुटल्यावीण संगति । नव्हे माया संतरण ॥४७८॥
मूळमाया त्रिगुणात्मक । साम्यावस्थे राहिली क्षैणक । किंचित खळबळ होतां देख । तीन्ही गुण प्रकटती ॥४७९॥
सात्विक । वृत्ति ज्ञानात्मक । रजोगुण कर्मात्मक । तमोगुण तो मोहात्मक । होय पतनाकारण ॥४८०॥
या तिन्ही गुणवृत्ती । जीवात्म्यासी बंधन करिती । पुनरावृत्तीसी कारण होती । करविती अध:पात ॥४८१॥
जो जो गुण उपजे । तो तो म्हणवी माझें माझें । माया प्रपंचाचें ओझें । शिरावरी सकळांच्या ॥४८२॥
त्या त्या गुणांचा अहंकार । तोचि डोईवरील भार । वाढवोनि करवी कारभार । नित्य अनित्य प्रपंचाचा ॥४८३॥
आतां निस्त्रैगुण्य व्हावें । तरी अहंकारातें टाकावें । सर्व करून अकर्ते व्हावें । नटापरी सदैव ॥४८४॥
नट दाविती नाटय रचना सोंगें । आणिती प्रकार नाना । भुलविती अखिल जना । आपण राहोनि अलिप्त ॥४८५॥
तैसें असावें संसारीं । लिप्त न व्हावें अंतरीं । करोनि सर्व अकर्त्यापरी । चालवावा व्यवहार ॥४८६॥
जे वेळीं जें उचित । तेचिं आचरावें विहित । परि भार न घ्यावा यत्किंचित । ईश्वरी इच्छा मानोनि ॥४८७॥
योगक्षेमाचीही चिंता । कधीं न वाहावी माथां । परमेश्वर जगन्नियंता । त्यावरी सर्व सोपवावें ॥४८८॥
ज्याचे सत्तेनें निर्माण झालें । तोचि रक्षण करील वहिलें । निश्चय मानोनि जे राहिले । तेचि तरले संसारीं ॥४८९॥
परी प्राणी चिंतातुर । होऊनि राहिले अधीर । विवेकहीन पामर । न सुचे कांही तयांसी ॥४९०॥
स्त्री पुत्र गृह धन । यांचा लोभ मनीं धरून । अंकित होऊनि राहिले पूर्ण । चिंता मोह भयग्रस्त ॥४९१॥
होणार ते चुकेना । कांही केल्या टळेना । व्यर्थ चिंता आपुले मना । कासयालागीं वाहावी ॥४९२॥
परी तें काहीं उमजेना । ईश्वरनिष्ठा उपजेना । मन:कल्पित भावना । दु:ख भोगवी जनासी ॥४९३॥
यालागीं असावें सावधान । ईश्वरनिष्ठा राखावी पूर्ण । तरीच मायेचें आवरण । दूर होईल निश्चयें ॥४९४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-11-24T03:06:23.3530000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

ponto-spinal (nerve) tract

  • Zool. सेतुमेरुचा पथ 
  • सेतु मेरुचे क्षेत्र 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू धर्मियांत मृत माणसाचा दहावा, तेरावा आणि चौदावा कां करतात?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.