मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ६

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ६

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्तीचा कैफ दारुण । समूळ उडवी देहाभिमान । प्रपंचभ्रांति निरसून । उन्मत्त करी साधका ॥१०७॥
मादकद्रव्यें सेवून । उन्मत्त होताती जन । परि ते होऊनि विषयाधीन । घात आपला करिताती ॥१०८॥
तैसी भक्ति नव्हे जाण । कांहीं सेवावें न लागून । साधकांचे मन वेधून । लावीं अखंड हरिचरणीं ॥१०९॥
चरणांचा महिमा अगाध । अंतरी उपजे स्वरूपबोध । बोधासवें परमानंद । प्रकटोनि करी उन्मत्त ॥११०॥
हे तो ज्ञानाची उन्मत्तता । सहज नये कोणाचि ये हातां । परि जयासी लाभे तत्वतां । तो उठे संसारामधूनि ॥१११॥
कोणाचा पुत्र कोणाचा मित्र । कोण तात कोण मातृ । सखे संबंधी सर्वत्र । हरिरूप एकत्वें ॥११२॥
हरिप्रेम संचरे अंतरीं । नाहीं देहभानाची उरीं । आपण यासकट चराचरीं । सर्वत्र देखे हरी भरला ॥११३॥
हरीसाच बोले चाले । हरीसमवेत निजे खेळे । सर्व व्यवहार करितां वेगळे । नव्हे कदापि एकला ॥११४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 15, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP