मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र २१

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २१

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


तैशाचि त्या गोपिका नारी । अनिवारप्रेम कृष्णावरी । देह गेह प्रपंचावरी । उदास होऊनि राहिल्या ॥२४४॥
अखंड चित्तीं कृष्णध्यान । कृष्णरूपीं गुंतले मन । आसन शयन भोजन । व्यवहार सर्व कृष्णमय ॥२४५॥
कृष्णावांचूनि गमेना । कृष्ण कृष्ण म्हणतां राहवेना । कृष्णावीण काळ क्रमेना । अखंड ध्यास तयाचा ॥२४६॥
कृष्ण राहिला अंतरीं । त्यासी शोधिती बाहेरी । घरीं दारीं नदीतारीं । कृष्णविरहें व्याकुळ ॥२४७॥
देहाचें झालें विस्मरण । कृष्णमय झालें मन । कृष्ण कृष्ण स्मरतां आपण । कृष्णरूप जाहल्या ॥२४८॥
कृष्ण आत्मा निजपति । कृष्ण देह गेह भूति । सर्वकाळ कृष्णप्रतीति । सर्वत्र होऊं लागली ॥२४९॥

N/A

References : N/A
Last Updated : November 16, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP