TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ९

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ९

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


॥ तस्मिन्ननन्यता तद्विरोधिषूदासीनता च ॥९॥
सर्वकाल सर्वभावें । ईश्वरासी कधीं न विसरावें । अनन्यता याचि नांवें । बोलिजे ते स्वभावें ॥१४६॥
आत्माराम अंतरीं । विसंबतां नये क्षणभरीं । त्याचे नि आधारें शरींरी । सर्व कार्यें चालती ॥१४७॥
जैसे सूत्राचे नि आधारें मणी । मालाकारें भ्रमोनि । दाविती आपणालागोनि । परी सूत्रअदृश्य ॥१४८॥
तैसे चैतन्याचे नि आधारें इंद्रियग्रामवावरें । व्यवहार सर्व चालती खरे । चैतन्य राहे अदृश्य ॥१४९॥
त्या चैतन्याची चित्सत्ता । सर्वकाळ आठवे चित्ता । तरीच बोलिजे अनन्यता । येरव्हीं सर्व विफळ ॥१५०॥
आतां या चैतन्याचें विस्मरण । व्हावयालागीं काय कारण । विषयासक्त झालें मन । तें नावरे कोणासी ॥१५१॥
इंद्रियाविषयांचे भेटी । सारिसाचि काम उठी । तो सदा प्राणियासि लोटी । भोगकर्दमीं कश्मळ ॥१५२॥
तेणें जीव भांबावले । विषयसुखा लांचावलें । स्वकर्तव्यातें चुकले । भ्रांतपणें लोलुप ॥१५३॥
परि या विषयाची बाधा । भगवद्भक्तांसी नव्हे कदा । उदासीनपणें वर्तती सदा । देही असोन विदेही ॥१५४॥
विषय तुच्छ नाशिवंत । क्षणिक सुखें आभासवंत यालागिं तेथें आसक्त । कदा नोहें मन त्याचें ॥१५५॥
अभ्रच्छाया लाभली । किंवा विस्कोटोनि गेली । दोहीं ठायीं नव्हे गुंतली । वृत्ति घर बांधणाराची ॥१५६॥
मृगजळाची नदे वाहिली किंवा सवेंचि ओसरली । मिथ्या मानोनि वहिली । शेतकरी तो उदासीन ॥१५७॥
तैसेचि जाणा भगवत्भक्त । विषयभोग प्राप्त अप्राप्त । दोहीं तेही नातळत । उदासीनपणें व्यवहार ॥१५८॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-11-15T10:17:33.2470000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

गळबंद

  • m  The necktie of cattle fastening them to the दावण. 
RANDOM WORD

Did you know?

I want Ganesh Puran marathi book which is on your site by Balbheem Bhat.
Category : Puranic Literature
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site