मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ५६ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५६ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ गौणी त्रिधा गुणभेदादार्तादि भेदाद्वा ॥५६॥ Translation - भाषांतर गौणी भक्तिचेही प्रकार । आतां निरूपिति साचार । ते श्रवण करा सादर । आत्महिताकारणें ॥५७८॥गौणी म्हणावयासी कारण । गुणसंबधें वर्ते जाण । सहेतुकपणा दावून । अज्ञान मूल वाढवी ॥५७९॥मूळ अज्ञानासी छेदक । ते मुख्य भक्ति एक । सहेतुक आणि भेदप्रवर्तक । त्रिविधा गौणी म्हणितलीं ॥५८०॥उपजे गुणांचिया मेळे । म्हणोनि गौणी म्हणितले । सत्व रज तम प्रकार झाले । स्वाभाविकपणें तियेचे ॥५८१॥आर्त जिज्ञासू अर्थार्थीं । हेही प्रकार आहेति । सविस्तरपणें निरूपिजति । ते प्रसंगें अवधारा ॥५८२॥एथ भक्ति बोलिली सामान्य । ईश्वराकडे धावें मन । आपलें इष्ट हेतूचें साधन । तेंचि कारण तियेसी ॥५८३॥आसुरी प्रकृति तमोगुण । ज्ञानाचें तेथ पडलें शून्य । इतरांचा घातपात करून । सुख भोगूं पाहाति ॥५८४॥ऐसें चार जार दरोडेखोर । त्यांच्या सुखासी पडतां अंतर । ईश्वरावरी घालिती भार । अघोर तप साधनें ॥५८५॥मंत्र यंत्र विधानें । अमंगल करिती अनुष्ठानें । मद्यमांसादि अर्पण करणें । घात करणें जीवांचा ॥५८६॥भूत प्रेत पिशाच्चसाधन । विपरीत सर्व करणी करून । मेळवूं पाहती सुख संपूर्ण । ऐसी भक्ति तयांची ॥५८७॥परि तेचिं त्यांसी होय बाधक । दुष्टकर्माचा होऊन परिपाक । भोगवी अंधतम नरक । प्रलयकालपर्यंत ॥५८८॥आतां राजसांची भक्ति । विषयभोगावरी आसक्ति । भोगार्थ ईश्वराराधना करिती । तेही पडती अपायीं ॥५८९॥भोगार्थ सकाम अनुष्ठान । क्वचित फलरूपही होय जाण । परि ते केवळ तुषकाडंण । कांहीं हातां नये तेथ ॥५९०॥विषयभोग तो क्षणिक । भोगतांचि वाढे भूक । भोग भोगिल्याही आराणुक । नव्हे समाधान कल्पांतीं ॥५९१॥जन्मवरी विषय भोगिले । परि ते अतृप्तचि होऊनि राहिले । छायेपुढा धावों लागले । तैसें झालें तयांसी ॥५९२॥ईश्वर सकरुण दयाधन । मनोरथही पुरवी जाण । परि त्याची योग्यता जाणून । याचना केली पाहिजे ॥५९३॥राजा प्रसन्न झाला । आणि तमाखूसी चुना मागितला । तरी तो काय न दे वाहिला । अज्ञानाची करी कींव ॥५९४॥म्हणे कोण्या एका निमित्तें । मजकडे याचें लक्ष लागतें । म्हणोनि पुरवी इच्छेतें । परि तें अमान्य तयासी ॥५९५॥क्षणिक भोग सुखासाठीं । ईश्वरासी पडे तुटी । हे काय म्हणवि भक्ति गोमटी । परीं हें न कळे तयासी ॥५९६॥आतां सात्विक हे भक्ति । तेथ अंतरीं द्वैत भ्रांति । आपणाहून देव निश्चिती । वेगळेपणें देखती ॥५९७॥अंतरीं भेदाची कल्पना । तेचि प्रतिबंधक होय जाणा । करितांही नाना उपासना । भेद राहिला कायम ॥५९८॥ईश्वर सर्वाचे अंतरीं । भरोनि राहिला बाहेरी । त्यासी कदापि न होतां दुरी । काय करणें तें करावे ॥५९९॥भेद धरिलिया ऐसें होईल । जवळीचा दूर जाईल । भावनेमुळे अंतर पडेल । नये कशानें सांधितां ॥६००॥अंतर राखूनि भक्त करणें । हे शुध्द भक्ति मी न म्हणें । जवळी असोनि त्या विसरणें । तेंचि मूळ अज्ञान ॥६०१॥त्यांची भक्ति जरी थोर । तरी भेदें भरलें अंतर । कर्मठ उपासक ज्ञानी साचार । परी नाडिले अज्ञानें ॥६०२॥अज्ञान कायम राहिलें । म्हणोनि गौणी ऐसें म्हणितलें । जवळीं जाऊन दूर राहिले । प्रकृतिगुणें आपल्या ॥६०३॥नाभीमाजी कस्तुरी । परि मृग हिंडे वनांतरीं । तैसीच त्यांसी झाली परी । आपआपणा नेणता ॥६०४॥मार्जार नासिकेस लागलें घृत । तें तयासी कळों न येत । सर्व पदार्थामाजी धुंडित । हिंडे वास तयाचा ॥६०५॥तैसी जाणा सात्विक भक्ति । आपणांसीचि जे नेणती । अज्ञान गेलिया निश्चिति । पूर्ण पदासी पाववी ॥६०६॥आत्तां आर्त जिज्ञासू अर्थार्थी । यांची ही ओळखण व्हावयाप्रति । प्रथम अर्थार्थीं याची स्थिति । बोलों सम्यक अवधारा ॥६०७॥कांही एक मनीं इच्छा धरून । आपुले उपायीं कुंठीत होऊन । मार्ग सांपडाया लागून । लागे ईश्वरभजनासी ॥६०८॥म्हणें हें कार्य साधेलातरीच । देव खरा म्हणों येईल । माझे मनोरथ पुरवील । तरीच समर्थ म्हणावा ॥६०९॥ईश्वर प्रसन्न झाला । मनोरथ सिध्दि गेला । मनीं थोर आनंद पावला । लाचावला सेवेसी ॥६१०॥पुन्हां काहीं प्रसंग पडला । देवाकडे धावोनि गेला । तोही मनींचा नवस पुरला । दृढावला भक्तिभावें ॥६११॥ऐसा दिवसेंदिवस प्रत्यय । येवों लागतां होय निश्चय । ईश्वरसेवेचें सर्व कार्य । करूं लागे विश्वासें ॥६१२॥क्वचित एखादिये प्रसंगी । जरी अपयश आलें भागी । तरी तेणें न डगमगीं । म्हणे चूक आपली ॥६१३॥ईश्वराचरी नाहीं बोल । माझी भावना जरी झाली विफल । तरी तो दीनदयाघन केवळ । निजभक्तांचा आधारू ॥६१४॥माझेचि काहीं असेल चुकलें । म्हणोनि कृपेसी अंतर पडलें । त्यावरी कोप करणें भलें । नव्हें पूर्ण विचारितां ॥६१५॥जो सर्वकाळ मज रक्षी । तो कैसेनि मज उपेक्षी । उपेक्षिलियाही सर्व पक्षीं । तयांतचि हित माझें ॥६१६॥ऐसा अर्थार्थी जो भक्त । तो ईश्वरभजनीं सदा रत । सहेतुकपणें आचरत । भक्तिमार्ग निष्टंक ॥६१७॥परी ऐसें होत जातां । कांही मागणें नुरे तत्वतां । ईश्वरकृपा कृतज्ञता । पूर्ण अंगीं बाणली ॥६१८॥म्हणे अदृश्यपणें राहून । सकल मनोरथ पुरवून । कृपा करी मजवरी पूर्ण । कोण तो मियां जाणावा ॥६१९॥त्याचें ज्ञान झाल्याविण । नव्हे आतां समाधान । तो जगदीश दिसो मजलागोन । आस लागली तयाची ॥६२०॥ऐसिया अवस्थे पातला । तो जिज्ञासू म्हणवितां भला । ज्ञानार्थ जो लाचावला । ईश्वरभक्ति करीतसे ॥६२१॥जिज्ञासा थोर वाढली । परी भोगेच्छा नाहीं सुटली । ऐसीं जन्मजन्मांतरें गेली । तळमळ करीत राहिला ॥६२२॥तयाचा होता परिपाक । कवणे तरी जन्मीं एक । वैराग्य पूर्ण बाणे देख । आन काहीं सुचेना ॥६२३॥अहर्निश तेंचि ध्यान । तेंचि चिंतन आणि मनन । अवस्था लागोनि राहिली पूर्ण । भेटीलागीं देवाच्या ॥६२४॥प्रारब्ध भोगोनि सारावें । क्रियमाण ईश्वरीं अर्पावें । चिंतने चिंतने निष्क्रिय व्हावें । आपण न करावें कांहिचि ॥६२५॥सर्व कर्ता जगदीश्वर । त्यानें निर्मिलें चराचर । त्याचें स्मरणीं तत्पर । सदा होऊन रहावें ॥६२६॥संचित जें वासनात्मक । तेंही हारपलें । नि:शेख । ईश्वरावांचून कांही एक । न व्हावें ऐसें जाहालें ॥६२७॥त्यावाचून न रुचे कांही । डोळ्यांपुढे न दिसे काहीं । देहेद्रियांचे व्यापार पाहीं । तन्मयपणें हारपले ॥६२८॥ऐसीये दशे पातला । तोचि आर्त म्हणतां भला । परी जोंवरी संशय नाहीं फिटला । तोंवरी तो अलिकडे ॥६२९॥परी भक्तांमाजी परमश्रेष्ठ । सर्वाहून जाणावा वरिष्ठ । भक्तिभावें अति निकट । ईश्वराजवळीं पातला ॥६३०॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP