मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ८२ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८२ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ गुणमाहात्म्यासक्ति, रूपासक्ति, पूजासक्ति, स्मरणासक्ति, दाससक्ति, सख्यासक्ति, वात्सल्यासक्ति, कांतासक्ति, आत्मनिवेदनासक्ति. तन्मयतासक्ति, परमविरहासक्तिरूपा एकधाप्येकादशधा भवति ॥८२॥ Translation - भाषांतर भक्ति बोलिली नवविधा । भागवतादि ग्रंथी प्रसिध्दा । येथें सांगति एकादशधा । नारदुमुनि विनोदें ॥११३७॥भक्ति उपजावया कारण । भगवदगुण माहात्म्य श्रवण । प्रथम सांगितेले साधन । मूळारंभ तेथोनि ॥११३८॥भगवदगुण श्रवण करितां । माहात्म्य त्याचें कानीं पडतां । ईश्वरनिष्ठा उपजे सुलभता । सामान्य सकळ जनांसी ॥११३९॥ऐकिलें तेंचि ऐकति । ऐकोनिया लुब्ध होती । श्रवणमात्रें पालटे मति । सवें लागती सन्मार्गी ॥११४०॥ईश्वराची व्हावया ओळख । गुणमाहात्म्य श्रवण प्रमुख । साधन जाणती सकल लोक । तत्पर होऊनि राहती ॥११४१॥ईश्वराच्या सगुण मूर्ती । देवालयी क्षेत्रीं तीर्थीं । पाहूनि जन लालचावती । दर्शनालागीं तयाच्या ॥११४२॥रूप देखतां लागे ध्यान । मन होऊं लागे उन्मन । ध्यान ठसावतां संपूर्ण । देहभाव विसरती ॥११४३॥दर्शनानें झाली तृप्ति । तेणें साधली परमशांति । दर्शनाचा हव्यास चित्तीं । तेणें राहिला जोडोनि ॥११४४॥जें रूप डोळां पाहिलें । तेचिं पुजावेसें वाटलें । पूजनीं तन्मयता पावले । ऐसें आहाती कित्येक ॥११४५॥स्वयें पूजा करूं लागतां । मन पावे एकाग्रता । पूज्य पूजक भाव हरपतां । तल्लीन होऊनि राहती ॥११४६॥पूजा करितां मनोभावें । भक्ति उपजे स्वभावें । यालागीं नित्य पूजावे । देव गुरू प्रतिमालिंग ॥११४७॥तैसेचि जाणा स्मरण चिंतन । अंतरात्म्याचें अनुसंधान । नित्य राखिल्या प्रयोजन । नाहीं बाह्योपचाराचें ॥११४८॥सहज नित्य स्वरूपगत । श्रीहरी जवळीच नांदत । सांडूनिया अन्य होत । त्यासी स्मरावें अखंड ॥११४९॥ऐसीही स्मरणासक्ति । तेथेंचि जे जडोनि राहति । त्यांसी न लगे आन युक्ति । भगवद्भक्ति साधाया ॥११५०॥अखंड स्मरणें अनन्यभक्ति । हृदयीं जडलिया सहजप्रीति । सर्वभावें जे अनुसरति । विकोनी घेतां आपणां ॥११५१॥तयांचे सकल व्यवहार । ईश्वरार्पण झाले साचार । भेदबुध्दिसी नाहीं थार । दास होऊनि राहिलो ॥११५२॥ते जाणावी दासासक्ति । अखंड ऐक्य भगवंती । अहोरात्र त्यांचे चित्ती । दुजाभाव नुमटे ॥११५३॥दास्य करितां फळा आलें । देवाचें सख्यत्व संपादिले । तें सख्यासक्ति नाम पावले । ऋणी केले भगवंता ॥११५४॥सख्यत्वें मैत्र संपादिलें । तेणें ईशकृपेसी पात्र झाले । तेणेचि वात्सल्य संपादिले । सर्वकाळ तयांचे ॥११५५॥तो भक्तजनवत्सल । प्रेमळजन प्रांजळ । तेणें वश केला घननीळ । आज्ञा झेलित भक्तांची ॥११५६॥ते जाणावी वात्सल्यासक्ति । ईश्वरकृपेची अनुभूति । पावोनि स्वयें कृतार्थ होती । इतरांसीहि उध्दरिती ॥११५७॥तैसेचि अनन्यपणें । कांतकांता या न्यायानें । सर्वभावें अनुसरणें । ते कांतासक्ति म्हणावी ॥११५८॥पतिव्रतेसी पतिवचन । वेदाज्ञेपरि प्रमाण । तयाची आज्ञा परिपालन । हाचि धर्म तियेचा ॥११५९॥विवाह झालियावरी । कुलगोत्र नाम परिहरी । आपुलीं कांहीं न ठेवी उरी । होऊनि राहे अर्धांगीं ॥११६०॥तैसें आपुलेंपणात त्यजुनि । सर्वस्व ईश्वरीं अर्पुनि । राहणें जें एकपणी । अभेदपणें तयासी ॥११६१॥आतां आत्मनिवेदन । ते यापुढील पायरी जाण । देहाचेंही वेगळेंपण । तेथ नाहीं अवशिष्ट ॥११६२॥सदेह सच्चिदानंदपणें । देहाभिमान त्यजुनि असणें । आपुलेपणाचा त्याग करणें । ते परमभक्ति ज्ञानोत्तर ॥११६३॥पराभक्ति म्हणति तियेसी । जे साधे आत्मनिवेदानासरिसी । वेगळेपण नुरता सवेसी । तन्मयता उपजवी ॥११६४॥आतां तन्मयतासक्ति । सांगावी नलगे आन रीति । तन्मयता तेचि भक्ति । सहज स्थिति लक्षण ॥११६५॥जो तन्मय होऊनि राहिला । तो सर्वकाळ तोचि झाला । अहं इंदतेसी विसरला । अखंड स्वरूपी चिन्मय ॥११६६॥सीमा झाली बोलण्याची । शब्द मावळला तेथेचि । नि:शब्दपणें शब्दाची । तेथें झाली परमावधी ॥११६७॥परि राहिलें एक लक्षण । परमविरहासक्ति कारण । संयोगी विद्योगी उपजवून । वेधिल्या गोपी रासक्रीडे ॥११६८॥रासक्रीडा भरासी आली । मध्येंच कृष्णमूर्ति हारपली । तेणें गोपिकांसी जाणों आली । किंमत कृष्णपणाची ॥११६९॥कृष्ण न देखतां नयनीं । गेल्या वेडयापिश्या होवोनि । स्थावर जंगमी शोध करोनि । पाहूं लागल्या तयासी ॥११७०॥तो न दिसे कोठेंही । कुंडीतून प्राण लवलाही । बाहेरी निघों लागला पाही । झाल्या अत्यंत विरहातुर ॥११७१॥कृष्ण तोचि अंतरात्मा । सकल विश्वाचा विश्वात्मा । प्रेममूर्ति प्रेमात्मा । हरपतां सकल हरपलें ॥११७२॥ऐशा व्याकुळ होतां क्षणीं । पुन्हां देखिला कृष्ण नयनीं । मग तोचि जडला ध्यानीं मनीं । झालें विसर्जन अहंतेचें ॥११७३॥अहंतेचे पूर्ण निरसन । व्हावया झालें अदर्शन । तेचिं पुनरपिं होतां दर्शन । झाल्या कृष्णरूपें निजांगें ॥११७४॥ऐशा एकादशप्रकारें । भक्तिचें अंगीं भरे वारें । साध्य साधन एकसरें । साधेल तैसें वर्तावें ॥११७५॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP