मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ४३

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ४३

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


भक्तिसी साधक सत्संगति । अपकारक कुसंगति । स्वभावधर्मातें उपजिविती । संगतिचि कारण साधकां ॥४१७॥
सस्तंगतिनें सद्गुण । दुष्टसंगतिनें दुष्ट गुण । उपजती याकारण । दु:संग तो टाकावा ॥४१८॥
बरें वाईट कळे सकळां कळोनि जो झाला आंधळा । त्यासि जरी उपदेश केला । तरी वायां जाय निष्फळ ॥४१९॥
तरी जाणोनि अंध न व्हावें । दुष्ट संगति तें टाकावें । नाहीं तरी भोगित राहावें । दुष्ट परिणाम तयाचे ॥४२०॥
साधकासी दु:संगति । क्षणैक झालिया निश्चिति । कैसियापरी नाडिती पीडिती । तेही किंचित अवधारा ॥४२१॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP