मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ८३ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ८३ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ इत्येवं वदंति जनजल्पनिर्भया: एकमता: कुमारव्यासशकुशांडिल्यगर्गविष्णुकौंडिण्यशेषोध्दरुणिबलिहनुमद्विभिषणदयो भक्याचार्या: ॥८३॥ Translation - भाषांतर इति शब्दें सुचविलें । भक्तिचें व्याख्यान संपलें । पुष्ट्यर्थ देताति दाखले । आणिक भक्ताचार्याचे ॥११७६॥ऐका म्हणति नारदमुनी । इतरही भक्तश्रेष्ठांनी । हाचि अभिप्राय निर्भयपणीं । एकमतें प्रतिपादिला ॥११७७॥लौकिक मत सांडूनि दूरी । स्वमताचें भरोवरी । स्वानुभवाचे जोरावरी । निश्चयात्मक बोलिले ॥११७८॥संमतिदाखल त्यांची नावें । घेऊनि सांगतो ऐका भावें । भक्तिचें स्वरूप कळों यावें । सामान्यपणे सकळांसी ॥११७९॥त्यामाजी प्रथम सनत्कुमार । ब्रह्मयाचे मानसपुत्र । निवृत्तिमार्गाचे परम उदार । ज्ञानदाते सदुगुरु ॥११८०॥ज्यासी हंसरूपें आपण । विष्णूंनी येऊन कथिलें ज्ञान । ब्रह्मदेवाचाही मान । राखिला वडिलपणाचा ॥११८१॥तैसेचि व्यासो नारायण । वेदमूर्ति स्वयें आपण । ज्याचे ज्ञानासी नाहीं परिमाण । पराशस्र सुत प्रसिध्द ॥११८२॥तैसेचि शुक महामुनि । जे ब्रह्मनिष्ठ सिध्दज्ञानी । भागवत मत विस्तारोनि । परीक्षितासी बोधिले ॥११८३॥शांडिल्य ऋषी परम पवित्र । भक्तिमार्गाचे शुध्दनेत्र । सूत्रें रचुनि स्वयें स्वतंत्र । उपकार केला जगावरी ॥११८४॥गर्गाचार्य संहिता कर्ते । विष्णु ऋषी भक्तिधर्ते । कौंडिण्यऋषी पूर्णज्ञाते । आकळिलें अनंता ॥११८५॥शेष सहस्त्रवदनांचा । अखंड जप हरिनामाचा । उध्दव अवतार प्रल्हादाचा । भक्तश्रेष्ठ शिरोमणी ॥११८६॥अरुणि भक्तिसंप्रदाय वक्ता । बलिदानवांचा अधिष्ठाता । त्रिपाद भूमिदान कर्ता । आकळिलें विष्णूसी ॥११८७॥हनुमंत महावीर । रामरायाचा सेवक थोर । रामचरणी झाला स्थिर । चिरंजीव पद पावला ॥११८८॥बिभीषण भक्तश्रेष्ठ । रावणाचा बंधु कनिष्ठ । रामभक्ति करूनि वरिष्ठ । लंकाधिपति जाहला ॥११८९॥ऐसे अनंत भक्त देती ग्वाही । भक्तिनें उध्दार लवलाही । जे जे कोणी पडले प्रवाही । तयां नाहीं आन गति ॥११९०॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP