मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ७७ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७७ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ सुखदु:खेच्छालाभादित्यक्ते काले प्रतीक्ष्यमाणे क्षणार्धमपि व्यर्थं न नेयम् ॥७७॥ Translation - भाषांतर काल अनंत अपार । गणना न करवे ऐसा थोर । अंगावरी चराचर । सृष्टि चालवी आपुल्या ॥९१६॥भूतें सचेतन अचेतन । जन्मा घालोनि स्वयें आपण । स्थितिकालीं संरक्षण । करोनि संहार तोचि करी ॥९१७॥तोचि ईश्वर कां न म्हणावा । सकळांसी असे ठावा । सकल घटना ज्याचीया मावा । घडों येति प्रत्यक्ष ॥९१८॥सकल सिध्दता जरी केली । तरी पाहावी लागे वेळ आली । वेळ न येतां व्यर्थ गेली । केली सर्व तयारी ॥९१९॥चंद्रहासासी मृत्यु यावा । म्हणोनि केला सर्व उठावा । परि मृत्युऐवजीं राज्यवैभवा । पावला प्रिय समागम ॥९२०॥हें कैसेनि घडों आलें । विचारूनि पाहतां भलें । देवें नव्हतें अनुवादिलें । म्हणोनि झालें उलट ॥९२१॥ईश्वरेच्छा तैसी नव्हती । म्हणोनि चंद्रहासा आयुष्यप्राप्ति । मृत्युची वेळ आली नव्हती । कारण नसे यापरतें ॥९२२॥म्हणोनि काल तोचि परमेश्वर । इच्छा तेचि गति सत्वर । संकल्पमात्रें संसारचक्र । राहिला नित्य फिरवोनि ॥९२३॥ईश्वरेच्छा कळेना । कालचक्र थांबवेना । जें जें होईल तें तें मना । संपादून घ्यावें लागे ॥९२४॥ईश्वरेच्छा तेचि कालसत्ता । दिसों आली स्वभावता । तरी कासया शिणावें आतां । कर्तृत्वाभिमान धरोनि ॥९२५॥सर्व कर्ता परमेश्वर । त्याची कालशक्ति धुरंधर । घडवीतसे अपंरपार । घटना सकल ब्रह्मांडाची ॥९२६॥त्या कालरूपी परमेश्वराची । सदैव आठवण ठेवण्याची । कर्तव्यता ओळखून साची । खबरदार असावें ॥९२७॥कालाचा अल्पविभाग । आयुष्येंरूपे लाभला चांग । तो ईश्वरस्मरणें यथासांग । सार्थकी लाविला पाहिजे ॥९२८॥क्षणोक्षणीं चिंतन स्मरण । ईश्वराचें करावें आपण । काल तोचि ईश्वर जाणून । सदैव त्यासी भजावें ॥९२९॥केवळ स्मरणं राखो जाता । ईश्वरत्व ये हातां । यालागीं सावधानता । सर्वकाळ असावी ॥९३०॥परी या संसारव्यवहारीं । प्राणी गुंतुन पडले आहारीं । वासनाचें भरोवरी । गाफील होऊनि राहिले ॥९३१॥मनानें जें मानिलें सुख । ते पाप्त व्हावया देख । करित राहिले प्रयत्न अनेक । तेणें वेचलें आयुष्य ॥९३२॥तें लवकरी न ये हाता । आलें तरी नव्हे तृप्तता । नित्यनूतन आशा वाढतां । भोगी दु:ख सुखाशें ॥९३३॥दु:ख टाळावयासाठी । करितां नित्य खटपटी । तेंचि भोगावें लागे शेवटी । टाळों जातां टळेना ॥९३४॥सुख दु:ख प्रारब्धादीन । हें नेणोनि सर्वहीजन । आयुष्य वेचिति निष्कारण । पुढें पडे ठाऊके ॥९३५॥न प्रार्थितां दु:ख । होतें प्राप्त स्वाभाविक । तरी काय नव्हेल सुख । त्याची आस करितां ॥९३६॥परी जीवासी न धरवे धीर । भोगाकारणें मन आतुर । व्यापार करवी निरंतर । सुख आणि दु:खाचा ॥९३७॥आयुष्य वेचिलें जन्मवरी । समाधान नाही अंतरी । ऐशा लगबगीं माझारीं । काळ ग्रासी अवचिता ॥९३८॥म्हणति अकाळीं मृत्यु आला । मनोरथ नाहीं पुरला । अनुभव हाचि घ्यावा लागला । प्रपंची मूढ जनांसी ॥९३९॥ऐसी सुखार्थ विवंचना । करितां जन्म गेला जाणा । तैसेंचि दु:खे भोगितां नाना । तळमळ करिती सुटकेची ॥९४०॥दु:ख संपविता संपेना । भोग भोगितां चुकेना । आशा कांहीं केल्या सुटेना । तीच मूळ दु:खाचें ॥९४१॥आशा वाढली हृदयांत । तेंचि निरंतर दु:ख भोगवीत । प्रयत्न करितांही अनंत । आशा कांही सुटेना ॥९४२॥आजचा दिवस जाईल । उद्यांचा भला उगवेल । ऐसे मनोरथ करितां वेळ । जाय सरोनि अकल्पित ॥९४३॥दिवस जाती मास जाती । नूतन संवत्सरें पालटती । मरण येतां मुखीं माती । सुखदु:खाची बोळवण ॥९४४॥परी इच्छा राहिली मनांत । ते पुन: जन्मासी घालीत । अनेक जन्मांतरें भोगवीत । इच्छा मूलक संसृति ॥९४५॥अहंतेपोटी जन्मलीं । द्वेषाची अर्धांगी बनली । कामाचे तारुण्या आली । स्वयें प्रसवली जगडंबर ॥९४६॥सर्व उद्योगासी मूळ । इच्छा वाढली प्रबळ । ते पसरवी आपुला वेल । गुरुफटी सकळांसी ॥९४७॥तेणें व्यर्थ जातो काळ । अतृप्तता माजली प्रबळ । पाठी आयुष्याची वेळा । भरतां झाली अवकळा ॥९४८॥इच्छेच्या पोटीं लाभ हानी । जीवासी लावी अनुसंधानीं । तेणें वायां गेले प्राणी । झाले मरणा आधीन ॥९४९॥मरण चुकवितां चुकेना । अवचित घाला घालोनि जाणा । अंतकाळीं जे वासना । तदनुरूप जन्मघेववी ॥९५०॥अंतकाळीं ईश्वरस्मरण । झालिया चुके जन्ममरण ईश्वरस्वरूप होय आपण । ऐसें सर्वत्र बोलती ॥९५१॥मरणकाल अकस्मात । पावोनि जीवा करी घात । मृत्यु टपोनि राहिला स्वस्थ । वेळ येतां कवटाळी ॥९५२॥म्हणोनि असावें सावधान । सर्वकाल ईश्वरस्मरण । हृदयीं राखावें संपूर्ण । मृत्यु येवो केव्हांही ॥९५३॥नारदमुनि ऐसें सांगति । सर्वकाळ राखावी भगवदस्मृति । तेणेंचि पावोनि उत्तमगति । जन्म मरण चुकेल ॥९५४॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP