TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ७५

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७५

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


॥ बाहुल्यावकाशत्वादनियतत्वाश्च ॥७५॥
विश्वास नाहीं वचनावरी । पांडित्य आपुलेचिं विस्तारी । प्रश्न करोनि आणी सरी । स्वयें आपण परीक्षकाची ॥८९४॥
स्वत:सी नाहीं पूर्ण । जो दुसर्‍याचें नायके वचन । स्वमताचा अभिमान धरून । छेडूं पाहे इतरांसी ॥८९५॥
त्यासी शिकवूं जातां व्यर्थ । शीणचि पडे पदरांत । कार्य कांहीं न साधे तेथ । फांटे फुटती वादासी ॥८९६॥
मूळ विषय राहे बाजूस । अवांतराचा वाढे धुडगूस । मुद्दा सोडूनि बडबडीस । ताळमंत्र राहीना ॥८९७॥
एकमेकांचें उणें काढिति । बोलतां बोलतां वर्दळीस येती । शिव्या देती मारों लागती । एकमेकां संतापोनि ॥८९८॥
मग लोक येऊन सोडविती । दोघांसीही मूर्ख ठरविती । पश्चात्तापासी न पावती । म्हणों लागती मीचि खरा ॥८९९॥
बेअब्रू होय दोघांची । वाट धरितां न्यायालयाची दंड शिक्षा भोगण्याची । आपत्ति ये मागुती ॥९००॥
ऐसा परिणाम वादाचा । जाणोनि निषेध सांगितला त्याचा । वाद सोडोनि भक्तिचा । मार्ग धरा जाणतेहो ॥९०१॥
वादानें वाद वाढतो । नियम काहीच न राहतो । वाद सांडिता सुखी होतो । म्हणोनि त्यजा तयासी ॥९०२॥
सांडोनि जनलोकांसी । वाद करावा आपणांसी । आपन आपुल्या हितार्थासी । आपणांसीच झगडावें ॥९०३॥
गुणदोष आपुले जाणावे । नीट परीक्षूनि पहावे । संत भगवदवचनें साधावें । स्वहित आपुलें जाणोनि ॥९०४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-11-24T03:30:15.8070000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

पैसा कसा मोडूं, मला येतें रडूं

  • कंजूष मनुष्यास पैसा खर्चणें मोठें जिवावर येतें. 
RANDOM WORD

Did you know?

हिंदू स्त्रियांच्या मंगळसूत्रातील काळ्या मण्यांचे महत्त्व काय?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Ved - Puran
Ved and Puran in audio format.