मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ५९

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५९

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


इचें सुलभत्व स्थापावया । नलगे प्रमाण शोधावया । जयाचें तयासी कळावया । प्रयत्नचि मूळ कारण ॥६४२॥
नलगे पुसावें कोणासी । किंवा हिंडावें देशोदेशी । आपुलिया मनोमानसीं । चिंतन सदा करावें ॥६४३॥
ईश्वर सर्व भूत हृदयस्थ । जवळीच असे नांदत । चिंतन करितां सकळ हेत । पुरवूं लागे सहज ॥६४४॥
चिंतन हें त्याची सेवा । जरी नित्य घडेल या जीवा । कशाचाही न पडे गोवा । सदा मन प्रसन्न ॥६४५॥
आनंदस्वरूप तयाचें । तेचिं अनुभवा ये साचें । म्हणोनि अन्य प्रमाणाचें । नाहीं तेथें प्रयोजन ॥६४६॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP