मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ३८ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ३८ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ मुख्यतस्तु महत्कृपयैव भगवत् कृपालेशाद्वा ॥३८॥ Translation - भाषांतर भीति उपजावया साधन । मुख्यत: सत्संगचि कारण । तेणें होय भगवददर्शन । जें उपजवी भक्तितें ॥३८४॥संतकृपेनें ईश्वरप्राप्ति । ईश्वरकृपेनें संतसंगति देहींचा मेळ होतां निश्चिती । भक्ति लाभें अनयासें ॥३८५॥संतासी देखतां संतपण । प्रकटे अंतरीं आत्मखूण । संगतीनें संतगुण । सहज उपजती स्वभावें ॥३८६॥संताची भेटी व्हावया । ईश्वरसेवा लागे करावया । सेवा करितां पोटीं दया । त्यासी उपजे निश्चित ॥३८७॥तो कृपाधन करुणामूर्ति । जाणोनि निजभक्ताची आर्ति । सेवेची करावया पूर्ति । गांठ घाली भक्ताची ॥३८८॥स्वयें तो जरी अबोलणा । तरी दीन जन दु:खशमना । बध्द परिकर होवोनि जाणा । तात्काळ संकट निवारी ॥३८९॥ज्यासी ज्यासी जे कामना । ते ओळखोनि तत्क्षणा । सत्वर करी उपाययोजना । ऐसी कृपा तयाची ॥३९०॥अर्थार्थीं जिज्ञासु आणि आर्त । ऐशा विविध कार्यार्थ । अवतार लीला जो दावित । तोचि ईश्वर म्हणावा ॥३९१॥तयाची कृपा झालियावरी । संत भेटती सत्वरीं । संतकृपेनें तो श्रीहरी । होय ओळगण भक्तांचा ॥३९२॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP