मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र ५३

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ५३

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


आतां पात्रतेवांचून । काहींच घडों नये जाण । कार्य जरी थोरसान । तरी पात्रता पाहिजे ॥५४४॥
भक्तिमार्गाची पात्रता । ते कैसेनि ये हातां । हाहि विचार प्रसंगता । केला पाहिजे ॥५४५॥
भक्ति म्हणजे भगवत्प्रेम । तें नैसर्गिकचि निरूपम । ईश्वरकृपेनें लाभे वर्म । जन्मोजन्मींच्या संस्कारें ॥५४६॥
एके जन्मीं लाभलें दिसे । परी अनेक जन्मींच्या अभ्यासें । सांचत सांचत उदैजत असे । पूर्वकर्मानुरोधानें ॥५४७॥
आजिचे जे भगवदभक्त । पूर्णता पावले ऐसे दिसत । ते कमाई करीत करीत । फळ पावले ये जन्मीं ॥५४८॥
जैसें लग्न घटिकापात्र । थेंबे थेंबे भरो येत । अखेरचा बिंदु जैं मिळत । जाय तत्काळ तळासी ॥५४९॥
तैसेचि येथेंही आहे । प्रेम उपजत उपजत लाहे । पूर्ण होऊनि स्वयें जाय । विरोनिया त्यामाजी ॥५५०॥
तन्मयता जरी होय ऐसी । तरी अनुभवा आणावी कैसी । वाच्य वाचक वचनत्वेसीं । स्वस्वरूपीं सामावली ॥५५१॥
म्हणोनि नये अनुमाना । वर्णितांही वर्णवेना । तर्कवितर्काची कल्पना । स्वयें निमोनि राहिली ॥५५२॥

N/A

References : N/A
Last Updated : November 24, 2015

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP