TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें|
सूत्र २२

श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र २२

नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे.


॥ तत्रापि ण माहाम्त्यज्ञानविस्मृत्यपवाद: ॥२२॥
श्रीकृष्ण प्रत्यक्ष ईश्वर । ऐसा मनीं दृढ निर्धार । शंका नये अणुमात्र । अद्भुत चरित्र देखतां ॥२५०॥
पूतनेचें केलें शोषण । शकटासुरांचे निर्मूलन । कालियाचें करून दमन । गोवर्धन उचलिला ॥२५१॥
दावाग्निपासून रक्षण । गोपगणाचें सांत्वन । करूनि आपत्तीचें निवारण । साक्ष सकलां दावितसे ॥२५२॥
दिसे तरी बालमूर्ति । कोमलांग शरीराकृति । नयनमनोहर कांति । अनंगासी लाजवी ॥२५३॥
परि सामर्थ्याची तुलना । करितां न करवे कोणा । ईश्वर प्रत्यक्ष हाचि जाणा । ऐसें सर्वत्र बोलती ॥२५४॥
गोपस्त्रिया भाळ्याभोळ्या । भावार्थानें अनुसरल्या । त्याही बोलों चालों विसरल्या । ईश्वरसामर्थ्य जाणोनि ॥२५५॥
श्रीकृष्ण प्रत्यक्ष ईश्वर । त्याहूनि नाहीं आणिक थोर । ऐसा मनीं दृढ निर्धार । सर्वकाळ सर्वांचा ॥२५६॥
कृष्णवेगळा नाहीं धर्म । कृष्णावेगळें नाहीं कर्म । कृष्णाविरहित नाहीं नेम । पाप पुण्य कृष्णात्मक ॥२५७॥
अखंड कृष्णध्यान हृदयीं । तेणें कृष्णरूप झाल्या पाहीं । देहगेहाची स्मृति नाहीं । कर्माकर्मा वेगळया ॥२५८॥
एसी कृष्णमय झाली स्थिति । देहभाव विवर्जित गति । देहीं असोनि विदेह स्थिति । अंतर्यामीं बाणली ॥२५९॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2015-11-16T01:55:56.1930000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

Did you know?

What is the Sati Practice?
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site