मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|श्रीनारदभक्तिसूत्रें| सूत्र ७९ श्रीनारदभक्तिसूत्रें स्तवन सूत्र १ सूत्र २, ३ सूत्र ४ सूत्र ५ सूत्र ६ सूत्र ७ सूत्र ८ सूत्र ९ सूत्र १० सूत्र ११ सूत्र १२ सूत्र १३ सूत्र १४ सूत्र १५ सूत्र १६ सूत्र १७ सूत्र १८ सूत्र १९ सूत्र २० सूत्र २१ सूत्र २२ सूत्र २३ सूत्र २४ सूत्र २५ सूत्र २६ सूत्र २७ सूत्र २८ सूत्र २९ सूत्र ३० सूत्र ३१ सूत्र ३२ सूत्र ३३ सूत्र ३४ सूत्र ३५ सूत्र ३६ सूत्र ३७ सूत्र ३८ सूत्र ३९ सूत्र ४० सूत्र ४१ सूत्र ४२ सूत्र ४३ सूत्र ४४ सूत्र ४५ सूत्र ४६ सूत्र ४७ सूत्र ४८ सूत्र ४९ सूत्र ५० सूत्र ५१ सूत्र ५२ सूत्र ५३ सूत्र ५४ सूत्र ५५ सूत्र ५६ सूत्र ५७ सूत्र ५८ सूत्र ५९ सूत्र ६० सूत्र ६१ सूत्र ६२ सूत्र ६३ सूत्र ६४ सूत्र ६५ सूत्र ६६ सूत्र ६७ सूत्र ६८ सूत्र ६९ सूत्र ७० सूत्र ७१ सूत्र ७२ सूत्र ७३ सूत्र ७४ सूत्र ७५ सूत्र ७६ सूत्र ७७ सूत्र ७८ सूत्र ७९ सूत्र ८० सूत्र ८१ सूत्र ८२ सूत्र ८३ सूत्र ८४ नारदभक्तिसूत्र विवरण श्रीनारदभक्तिसूत्रें - सूत्र ७९ नारद भक्ति सूत्र या ग्रंथाचे रसाळ निरूपण संत केशवराज महाराज देशनुख यांनी केले आहे. Tags : keshavraj deshamukhnaradtranslationअनुवादकेशवराज देशमुखनारद ॥ सर्वदा सर्वभावेन निश्चिंतितैर्भगवानेव भजनीय: ॥७९॥ Translation - भाषांतर सर्व काल स्मरावें ईश्वरासी । काया वाचा आणि मनेंसी । चिंता सांडोनि भरवंसी । तोचि एक भजावा ॥१०७३॥आयुष्य वेचें क्षणक्षणा । मूळ येईल मरणा । सर्वकाळ सावधपणा । राखावा आत्मनिश्चयें ॥१०७४॥भक्तिमार्गाचें प्रमुख साधन । करावें अखंड नामस्मरण । हरिचिंतनावीण आपण । राहों नये क्षणैक ॥१०७५॥इतर साधनें तात्पुरतीं । भक्तिमार्गाची अखंड ज्योती । अहोरात्र ध्यास चित्तीं । राहिला पाहिजे तयाचा ॥१०७६॥अखंड चिंतन तयाचें । विश्वात्मक प्रभु देवाचें । राहिल्या स्वरूपही साचें । दिसों लागे डोळिया ॥१०७७॥तयासीच म्हणति ध्यान । सर्वात्मक स्वरूप दर्शन । अवघीं तयाचीं रूपें जाणुन । नम्र व्हावें त्याठायीं ॥१०७८॥नमन करावें तयासी । सेव्य सेवक भावेंसी । तत्पर असावें अहर्निशीं । अहंममता सांडोनि ॥१०७९॥हें ऐसें कैसेनि घडेल । अखंड स्मरण राखों येईल । ऐसी शंका मनीं येईल । तरी सांगतों अवधारा ॥१०८०॥अखंड प्रेम ज्याठायीं । त्याचें स्मरण सहज राही । मुद्दाम करावें लागत नाहीं । ऐसे असे स्वभावें ॥१०८१॥स्त्री पुत्र गृह वित्त । यांचे ठायीं जडलें चित्त । स्मरण त्याचें चालिलें सतत । न लावितां ध्यान लागे ॥१०८२॥प्रपंचावरी जैसें प्रेम । तैसें ईश्वरी जडतां नि:सीम । सर्वकाळ स्मरणाचा नियम । अनायासें साधेल ॥१०८३॥प्रेम उपजतां ह्रदयीं । स्मरण करावें लागत नाही । तोचि स्वभाव ठायीचें ठायी । होऊनि राहे आपुला ॥१०८४॥विषयाचें ध्यान सुटेल । तैं भगवंती मन जडेल । तोचि मग दिसों लागेल । डोळियांपुढे अखंड ॥१०८५॥विषयाचें ध्यान नाशिवंत । अविनाश स्वरूप भगवंत । त्याचें ठायीं जडतां चित्त । अविनाश करी आपणा ॥१०८६॥म्हणोनि त्याचेंच चिंतन करावें । अखंड ध्यान धरावें । सर्वकाळ असों द्यावें । प्रेम अंतरीं तयाचें ॥१०८७॥काया वाचा आणि मनें । असावें तयासी अनन्यपणें । देह वेचांवा त्याकारणें । प्राप्ति व्हावया तयाची ॥१०८८॥श्रोत्र चक्षु जिव्हा घ्राण । करावीं तयासी अर्पण । त्वगिंद्रिय करचरण । सकल योजावीं तन्निमित्त ॥१०८९॥हरिकथा कानीं ऐकावी । किंवा ऐकितों ते हरि । कथा म्हणावी । बोलतां बोल बोलवी । तो नव्हे आण हरिवीण ॥१०९०॥जो जो काहीं बोल उठे । तो हरिप्रेरणेवीण नुमटे । निंदा स्तुति कानावाटे । ऐकतां नये कंटाळूं ॥१०९१॥सकल इंद्रियाचें व्यापार । सर्वत्र घडती साचार । ते हरिवीण न धरिती थार । मानावें सर्व हरिरूप ॥१०९२॥श्रवणीं ऐकतो तो हरी । नेत्रीं पाहतो तोही हरी । त्वकजिव्हा घ्राण व्यवहारीं । तोचि एक जाणावा ॥१०९३॥देह अर्पावा तयासी । शास्त्रदृष्टि शुध्दपणेंसी । आचरण राखावें नियमेसी । विस्मरण होऊं न द्यावें ॥१०९४॥वाणीनें अखंड नामोच्चार । सत्यभाषणीं निर्धार । मन रमवावें निरंतर । कल्पना करोनि तयाची ॥१०९५॥तयाची कल्पना करो जातां । तो कल्पनेरहित होय तत्वतां । कल्पनेसी धरो जातां । होय कल्पना हरिरूप ॥१०९६॥ऐसें काया वाचा आणि मनें । अनन्य होऊनि शरण जाणें । चिंता काहीं न करणे । घडेल कैसें कैशापरि ॥१०९७॥योगक्षेम कैसा साधेल । भयसंकट कैसे टळेल । येंविषयीं न व्हावे व्याकुळ । भार घालावा तयावरी ॥१०९८॥तो सत्ताधारी जगदीश । त्यासी न लागे अवकाश । चिंतन केलिया सावकाश । सकल आपदा परिहरी ॥१०९९॥आपण करावें चिंतन । चिंता सोपवावी त्यालागोन । मनीं निर्धार पूर्ण राखोन । ब्रीद सत्य करावें ॥११००॥तो चिंतेसी नेदिल उरों । चिंतने चिंतने काळ सरो । कार्यसिध्दीसी अवसरा । नाहीं धीर धरलिया ॥११०१॥त्याचेचिं स्मरण करावें । सदा त्यासी मनीं ध्यावें । दैन्यदु:ख नुरे स्वभाव । ऐसा महिमा तयाचा ॥११०२॥आतां या स्मरणाचें फळ । कोण्या प्रकारें लाभेल । तें ऐका स्पष्ट बोल । नारदमुनीचें सिध्दवाक्य ॥११०३॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2015 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP