मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत|
स्मरण आणि उत्कण्ठा

स्मरण आणि उत्कण्ठा

केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे.


( शार्दूलविक्रीडित )

एकान्तीं असतां घरीं तुज सखे ‘ हे सारिके !’ बाहिलें,
‘ हे माझे शुकराज ! ’ हे म्हणुनि तूं मातें मिठी मारिली;
‘ माझे जातिलते ! ’ म्हणून तुजला मीं गाढ आलिंगिली,
तों ’ माझे सहकार ! ’ हें मधुर गे तूं नाम मातें दिलें;

‘ माझे रम्य विहारपुष्करिणि गे ! ’ मीं तूज संबोधिलें,
‘ माझे मानसहंस हो ! ’ सरस हें वाणी तुझी बोलिली;
‘ क्रीडासिंधुमधील हे मम तरी ! ’ ही साद मी घातिली,
‘ माझे नाविक हो प्रवीण ! ’ म्हणुनी मातें तुवां चुम्बिलें !

प्रीतीची सरिता उचंबळुनि त्या आसक्त संबोधनीं,
ओघामाजि तिच्या प्रिये ! उभयतां तैं पावलों मज्जन !
उत्कण्ठा ह्रदयांत, तें स्मरुनियां संदीप्त ती होउनी,
रात्रीं या विरहें तुझ्या तळमळें हा मी अभागी जन !

घेई ध्यास तुचा म्हणून मज दे निद्रा गडे सोडुनी,
तेणें दुर्लभ गे तुझें अहह !  तें स्वप्नांतही दर्शन !

२९ डिसेंबर १९०१

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP