मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशवसुत| कविता आणि प्रीति केशवसुत प्रियेचें ध्यान सृष्टि आणि कवि कविता आणि कवि अढळ सौंदर्य अपरकविता दैवत दुर्मुखलेला एका भारतीयाचे उद्गार एक खेडें मित्राचि खोली गोष्टी घराकडील मुळामुठेच्या तीरावर एका तरुणीस ईश्वराचा ग्रंथ पहिला प्रश्न रा. वा. ब. पटवर्धन जग प्रियेचें सौंदर्य प्रीति समृद्धि आणि प्रीति मजुरावर उपासमारीची पाळी प्रयाणगीत विकसन पुष्पाप्रत प्रत माझा अन्त कविता आणि प्रीति स्वप्न सृष्टि, तत्त्व आणि दिव्यद्दष्टि स्वर्ग, पृथ्वी आणि मनुष्प सिंहावलोकन दिव्य ठिणगी पुष्पमाला भृंग प्रीतीची भाषा कल्पकता रूढि-सृष्टि-कलि कवि फुलांची पखरण पुष्पाप्रत फूलपांखरू शब्दांनो ! मागुते या ! दिवा आणि तारा ‘ पण लक्षांत कोण घेतो ?’ च्या कर्त्यास मयूरासन आणि ताजमहाल चिरवियुक्ताचा उद्गार संध्याकाळ आहे जीवित काय ? भास तुतारी झपूर्झा थकलेल्या भटकणाराचें गाणें प्रीति आणि तूं कवितेचें प्रयोजन मूर्ति दोन बाजी सृष्टी आणि कवि दिवस आणि रात्र दंवाचे थेंव स्फूर्ति रांगोळी घालतांना पाहून मूर्तिभंजन रुष्ट सुन्दरीस काव्य कोणाचें ? पद्यपंक्ति कविच्या ह्रदयीं जसें गुंगती -- फार दिवसांनीं भेट नवा शिपाई प्रणयकथन नैऋत्येकडील वारा वियोगामुळें निशाणीची प्रशंसा वातचक्र सतारीचे बोल “ कोणीकडून ? कोणीकडे ? ” दिवाळी म्हातारी आम्ही कोण ? घुबड वियुक्ताचा उद्गार स्मरण आणि उत्कण्ठा आईकरितां शोक फिर्याद दूर कोठें एकला जाउनीयां प्रतिभा गोफण केली छान ! मनोहारिणी हरपलें श्रेय खिडकीकडे मौज पहावयास उगवत असलेल्या सूर्यास मरणकाल जयाजीराव शिंदे व तुकोजीराव होळकर जरी तूं ह्या येथें असतिस नाहीं ज्यापरि डोंगळा गांवीं गेलेल्या मित्राची खोली सर्ग १ ला आगबोटीच्या कांठाशीं मदन आणि मदनिका जास्वंदीचीं फुलें, आणि पारिजाताचीं फुलें अहा पक्षी हे चित्र पक्ष यांचे ! कामान्धत्व जायाचें जग का असेंच ? मजुरावर उपासमारीची पाळी प्रयाणगीत मुलांस झोडपणार्या एका पंतोजीस जगामधीं या तुला कशाला परमेशें धाडिलें ? समृद्धि आणि प्रीति तत्त्वतः बघतां नामा वेगळा० इत्यादि कविता आणि प्रीति केशवसुतांच्या काव्यांवर क्रांतिकारक विचारांचा, स्वातंत्र्यवादाचा, मानवधर्माचा आणि आत्मनिष्ठेचा प्रभाव आहे. Tags : kavyakeshavasutpoemकविताकाव्यकेशवसुतमराठी कविता आणि प्रीति Translation - भाषांतर ( भुजंगप्रयात )फिरावयास मी मित्र घेवोनि गेलों;बघोनी सुरम्य स्थळा एक ठेलों;किती हारिनें वृक्ष ते दाट होते,जलाचे तळीं पाट होते वहाते;तृणाच्या मधीं, राखिल्या गार जागाकडेनें तयांच्या, लतांच्याहि रांगा---फुलांच्या बहारांत त्या शोभताती;अलींचे थवे त्यांवरी धांव घेती;मधूनी किती पक्षि ते गोड गाती.मृगेंही मघें स्वैर तीं क्रीडताती;मयूरें अहा ! दाखवीती पिसारे;बघूनी मना तोष होई अहा रे !मधें अंगना स्पृष्ट ज्या यौवनानेंनजाऽव्याजरूपास साध्या मदानेंइथूनी तिथें चंचला नाचवीती,पदालंकृति झंकृति तैं करीती; मुलें खेळती नाचतीही मजेनें,तयांचा अहो कोण उल्हास वाने ?फुलें, तारका, ते दंवाचे तुषार,तशीं मुग्ध हीं बालकें दिव्य फार !अशी तेथली पाहुनी रम्य लीला,मुखीं घालूनी ठाकलों अंगुलीला;वदे मित्र मातें---“ पुढें चालणें ना ? ”परी पाय तेथूनियां काढवेना !( वसंततिलका )बोले सखा “ गढुनि कां इतुका मनीं तूं ? ”मी बोललों “ बघ मनांत विचारुनी तूं ”तेव्हां पुसे “ अडविते कतिता ? ”---“ नव्हे रे,प्रीती मला भूलविते-नच हालवे रे ! ”मुंबई, ७ जानेवारी १८९० N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP