मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
स्वप्नांची माला !

माधव जूलियन - स्वप्नांची माला !

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति चन्द्रकान्त]

जीवित म्हणजे असे बापुडी स्वप्नांची माला -
स्वप्नहीन परि हाय न येऐ झोपच जीवाला.
निमिषाचा लक्षांश टिको हें स्वप्न परि न खोटें.
त्यांतच हासे अन्‌ वस्णावे जीव, नवल मोठें.
ब्रम्हायाच्या त्या एकच निमिषीं कितीक मनु होती,
जशा कदाचित क्षणीं कुणाच्या ब्रम्हायाच्या कोटी !
आणि चिमुकलीं फुलें भूतलीं नक्षत्रापरि तीं
नसेतना दीर्घायु !! परन्तु स्मित गन्धित करिती.
अनाद्यनन्त प्रभु जो त्याला किती पुन्हा प्रिय तीं !
दुर्बल मानव, त्यास खरोखर अगम्य ही नियती.
म्हणून पुरवा आस ऐवढी माझी देवा जी,
प्रीतिचारुता फुलवा माझ्या औद्यानामाजी.
माळ सुगन्धी बकुळीच्यापरि कुतुकें ही घाला -
जीवित म्हणजे असे बापुडी स्वप्नांची माला !

ता. ४ जानेवारी १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP