मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
ऐन्शाल्ला

माधव जूलियन - ऐन्शाल्ला

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


अल्लाच्या मुलखांत ऐकच करा ऐस्लाम भूमीवर !
वाटे ती तर युद्ध भूमिच तुम्हां जेथे न तो अईश्वर;
‘ऐल्लल्लाहु ऐलाह ला !’ गरजुनी ‘अल्लाहु अक्बर, !’ तुम्ही
‘सारे भाविक बन्धु !’ ऐक्य - समतायोगें करा मर्दुमी १

आहे ऐकच तो मुहम्मद तुम्हां तो अन्तिम प्रेषित,
सर्वांना प्रभुवाक्य ऐकच असे, साधे कुराणें हित;
युष्मदद्दष्टि वळे निमाजसमयीं त्या ऐक ‘काव्या’ कडे,
मक्का ऐकच पूण्यभूमि तुमची, तेथेच यात्रा घडे. २

साधा धर्म मुहम्मदी, औगिच तो घालीच ना बन्धनें,
दाबा साहस आणि घ्या यश, पुनर्जन्मीं न आशा म्हणे.
हा अऊर्जस्वल धर्म नन्द्य तुमचा बेलाग किल्ला सदा,
ऐन्शाला तुडवीत काफिर जगीं ‘अल्हम्दु लिलाह ।’ वदा. ३

कां व्हावा परधर्म सहयच ? नका त्या शान्तिवादा भुलूं -
लोकीं ऐकच सत्य, काफिर जिथे त्याला तिथे ‘औक्तुलू’ -
जो जो काफिर त्यास दुर्गति सदा ! त्याला न द्या आसरा,
जो जो मुस्लिम त्यास सदगति सदा ! औत्कर्ष त्याचा करा. ४

ताम्बारे न तिखें कधीच तुमचें या दास - देशामधे,
गाजी होऔनि बुत्शिकन धन लुटा सामर्थ्यसत्तामदें;
मृत्युची न तुम्हांस भीति, तुमची श्रद्धा असे ठाम ही -
ऐश्वर्येच, हौतात्म होऔनि जगा या येथ भोगा मही. ५

भोगैश्वर्य नसे निषिद्ध ऐथलें, सेवूनि ही माधुरी
बेहेस्तांत पहा बहात्तर पुन्हा नेत्राभिरामा हुरी -
रौप्याङगी, चिरयौवना, विधुमुखी, कस्तूरिकाकुन्तला,
मत्ताक्षी, सरुयष्टि, हारितगती, पीनस्तनी, पेशला. ६

औत्सुक्यें बघतात वाट वर त्या स्वर्गीय पाटस्थलीं
जेथे बुल्बुलपङिक्त पाटलसुमाभावीं न अस्वस्थली;
द्याया मद्य पवित्र ओतुनि तिथे सौन्दर्यवान भृत्य ते
लालित्यें पुरवूनि हौस तुमची होती कृतकृत्य तें. ७

मध्यस्थी तुमची करीलच नवी, शङका पहा यांत ना;
अल्ला फेकिल काफिरास तपनीं द्याया महा यातना;
सारासार तुम्ही विचार करितां अन दावितां साहस,
शौर्यं ‘दीन’ म्हणतांच दीन दुनिया होऐ तुम्हांला वश. ८

हिंदुस्थान न राष्ट्र, खास तुमची ही भोगभूमी असे,
ऐशाराम मिळे ऐथे खचित तो त्या शाम - रुमीं नसे;
कोणा क्षत्रिय - सुन्दरी नृपसुता मर्यम झमानी वरी ?
- त्या श्रेष्ठासच जो स्वराज्य पसरी या हिन्दुभूमीवरी. ९

ता. १४ जुलै १९२५

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP