मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन| बरा सुटला बिचारा ! माधव ज्युलियन गज्जलाञ्जलि प्रकाशित असंग्रहीत कविता प्रकाशित संग्रहीत कविता तुटलेले दुवे म्हणजेच सुनीताञ्जली मुरली पतंगाची आशा चिमुकली शान्ता आत्म निवेदन निसर्ग आणि मी श्याम रजनी स्वप्नयोग मुलाचा प्रश्न प्रेमळे, जाशिल का सोडून ! चान्दण्यांतील हुरहुर कञ्चनी हाकाटी माझी ताई रसिकास सङगमोत्सुक डोह माझें माहेर - सासर ऐन्शाल्ला मराठबाणा खरा शूर ऐकव तव मधु बोल वृद्ध कवि कलारहस्य वादळाची रात पोचवणूक महाराष्ट्र - गीत पाहुं कुठे तुज राया ? अजुनि किती छळतोस अभिसारिका तूच निर्वाणींचा सखा भुकेलें हृदय बुल्बुलास अनामक वीराची समाधि अन्धारून आलें चन्द्रिका आणि प्रिया केवढा अन्याय ! फेराचें गाणें तुझ्यावाचून कीर्ति आणि कान्ता कशासाठी ? पोटासाठी ! संवाद भातुलीचें गाणें माझी बाहुली अङगाऐ आमचें घर आगगाडी मेलों तरी मेलों माळ - वारा उठा रे ! देवळांत जाऊ बाप्पा मोरया काऊ काऊ गे ! स्वप्नांची माला ! लेजीम प्रार्थना माझ्या व्याकुळतां जीव सृष्टीचें घ्यान मुलांचा साडूगाती सर्वस्वाचा यज्ञयाग पापाची चलती नावेंतील गाणें काय अवेळीं साद ? वृद्ध भटजी सर्वा खल्वियं माया ! मधुसुन्दरीस श्रान्त पान्थास कवि भास्करास पुरुषाची छाती जा स्वतन्त्रतेची मौज चाख ! भ्रष्टा दग्धपक्ष पतङग बरा सुटला बिचारा ! आत्मप्रतीति सेवा - धर्म निर्झरास ऊक कणिका पापशङकी हरिताम्बरा चल ऊडुनि पाखरा ! चन्दाराणी गोड बाल्य डोला बाऊ, डोला ! राजभक्ति बघें प्रथम मी बालवयीं सुप्रभात ! माधव जूलियन - बरा सुटला बिचारा ! डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले. Tags : kavitamadhav julianpoemकविताकाव्यमराठीमाधव जूलियन बरा सुटला बिचारा ! Translation - भाषांतर Peace ! Peace ! disturb him not After life's fitful fever he sleeps well.- Shakespeare[वृत्त वसन्ततिलका]कां सभ्य शोक जन हो करितां अकालीं ?प्रत्यक्ष हानि तुमची किति काय झाली ?मेला मयूर, ऊरलाच परी पिसारा -गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! १मागे पुसे कुणि, “अहो, कविता नटी का ?”“दुर्वृत्त साहजिक ही !” करि आन टीका.सोसावया अजि नकोच दुरुक्ति - मारा -गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! २आशाज्वरें विकल तप्त पडे, झुरे तो,स्वप्नांत काव्य करुणोत्कट तें स्फुरे तों;भिन्ती नसूनि जग त्या विहगास कारा -गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ३टाकी कशावर तनू, कवि काय खाऊ ?काव्यात्मजीवित कसें असहाय जाऊ ?हे प्रश्न कां करिल काव्यसुधा पिणारा ?गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ४गेला जरी न चरकांतुनि ऊक्षुदण्ड,वाहेल केवि रस गोड तरी ऊदण्ड ?घ्या शर्करा धवल, भाव हिचा विचारा -गेला कवीश्वर, बरा सुटला बिचार ! ५काव्याहुनी खचित जीवित होय थोर,पाही मजाच परि दैव कठोर घोर.काव्यास थाम्बुनि तरी जग देऊ थारा -गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ६प्रीत्यर्थ तो तडफडे, झगडे जनांशी,प्रक्षुब्ध होय भवसागर सर्वनाशी;आता असेल दिसला तळ वा किनारा -गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ७हो आज शान्त कवि मारुनि आर्त हाका,प्रेमप्रकोप मरणोत्तर हाय हा कां ?कां तत्स्मृतीवर अता स्तुतिचा निखारा !गेला कवीश्वर, बरा सुटला बिचारा ! ८ता. १४ ऑक्टोबर १९३१ N/A References : N/A Last Updated : November 11, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP