मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
देवळांत जाऊ

माधव जूलियन - देवळांत जाऊ

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[छन्द]

देवळांत आऊ
देवबाप्पा पाहूं
करूं नमस्कार
वाहूं फूलहार
आपुला कैवारी
सङकट निवारी

चोहीकडे हात
त्याचे पोचतात
काळाचाहि काळ
होऊई स्वत: बाळ
खोडकर तान्हा
यशोदेचा कान्हा !

डिसेम्बर १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP