मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
महाराष्ट्र - गीत

माधव जूलियन - महाराष्ट्र - गीत

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[छन्द]

मराठीला सङगोपून वैभव दे ज्ञानेश
मराठयांना मेळवा हा समर्थांचा सन्देश
महाराष्ट्र जन्म पावे धन्य स्वदेश !
येऐ शिव निवाराया सारे दास्याचे क्लश १

वतनाचे बन्दे खन्दे आपसांत लढले,
स्वामिभक्तीमध्ये राष्ट्र बुडवूनी चढले,
कुळ - वाडीपायी पहा कलमाही पढले,
परकीयदास्यपडकीं स्वस्थ झाले विशेष, २

भान्जलेल्या धर्ममूर्ती रानोमाळ पडती,
गान्जलेल्या हिन्दु देवी जनान्यांत कढती,
खेडवळ मुके जीव दारिद्यांत कुढती,
चाले परी अमीरांचा ऐशाराम हमेश ? ३

पण्ढरीचा सन्त तोही भक्तिभाव गौरवी,
आध्यात्मिक मुक्तींतच मानी सुखथोरवी,
राष्टूमुक्तीचाच परी औदयाला ये रवी
योगी कर्म - कुशलाला कशाचें हो अपेश ? ४

मावळीचे प्रामाणिक मावळे हे बावळे,
त्यांच्या पुढे शिद्दी - तुरुकांची छबी मावळे,
नेता यांचा श्रीशिवाजी तेज याचें आगळे,
हर हर महादेव ! चिरञ्जीव स्वदेश ! ५

म्लेञ्छापुढे मराठयांनो, कां व्हा दीन, कां वाका ?
फडफडे भोसल्यांच्या प्रतापाची पताका !
अल्पसन्तुष्टता का रे ? ठेवा थोर आवाका !
एसरूं द्या हिन्दुस्थानभर नवा आवेश ! ६

ता. ९ ऑक्टोबर १९२६     

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP