मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
अनामक वीराची समाधि

माधव जूलियन - अनामक वीराची समाधि

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति श्यामाराणी]

हें भव्य कुणाचें गे थडगें ?
वाहती नृपहि सुम - मण्डल गे. ध्रु०

कुठले कुठले येऔनि लढले,
वीर क्षेत्रीं अगणित पडले;
निवारशी जें शव सापडलें, औचलुनि धरिलें त्यास जगें. १

पोटासाठी कुणी शिपाऐ,
वा नैराश्यें यमास बाही,
प्राण घे नि दे, भाण्डण नाही, सत्य काय पण कोण बघे ? २

असेल अन्य क्षेत्रीं लढला,
परिस्थितीशी बिकट झगडला
न कळे जितला अथवा पडला, का चोरुनि कुणि तद्यश घे. ३

नाव कळेना त्या समराचें.
नाव कळेना या वीराचें,
स्मारक पण हें राष्ट्रनराचे ! - झुके खरोखर जग अवघें ! ४

अहुनि औपेक्षा, कहर अवास्तव
असेल झुरला प्रेमवचास्तव,
वाद्यसङघ गाजवी अता स्तव, औषध मेल्यावर नलगे. ५

अनामका, तव सरली धडपड
नीज तळीं, जरि वर ही गडबड -
जगच्छान्तिची पोकळ बडबड ! खणखणती कोषीं खडगें ! ६

ता. २७ में १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP