मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
भ्रष्टा

माधव जूलियन - भ्रष्टा

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति चन्द्रकान्त]

देवा, तू का आम्ही क्रूर ? ध्रु०

कुणी अचानक अनाथ केलें सुन्दर तरुणीला ?
क्षण स्तिमित कां, केलें कां नच तनुमन दोन्ही चूर ? १

हाय जिवट तनु ! हाय जिवट मन ! लीला प्रकृतिची !
सुटे ग्रहण तों पूर्णशशिमुखीं ये पूर्वींचा नूर. २

विरक्त ऋषिही सत्यवतीचा रसिक राहु जर हो.
काय बुभुक्षित न करित दिसतां टन्च सरस अङगूर ३

जरी बहात्तर हुरी प्रतीक्षा करिती बेहेस्तीं
गाजी घाली झडप भूवरहि कोठे दिसतां हूर ! ४

अबला, मोहक, अजाण - छे ! हा जगीं त्रिदोषच की !
त्यांतूनि विधवा अपशकुनी - तिज पळवी शकुनी दूर ! ५

रामराज्य तें, जनापवादें सती गृहास मुके,
भूशशिलक्ष्माविषयी काढी न कुणि ‘मलिनमपि ’- सूर. ६

गोशांतच  खितपणें अरींची वाढवीत सहख्या -
लोकसङग्रह क्षेत्रन्यायी व्यक्तींना न जरूर. ७

कां नाजुक अन्याय चोरटा वेशीवर टाङगा ?
झाका, राखा अब्रु ! होऊं द्या चोर थोर मग्रुर ! ८

बडे शिष्ट कुणि देऊंहि बघतिल आश्रय सोयीचा,
ऊद्धारक सहधर्मिणीत्व तें द्याया कोठे शूर ? ९

परि नरजननी, तू ऊकाकी अनिकेत न राही,
परित्यक्त पिरका मीहि, धडधडे तुझ्यास्तव ऊर ! १०

प्रकाश शीतल वरस्त राही, तापुनि शापुं नको;
बुडविशील तर वाहवुनि कारुण्याचा पूर ! ११

ता. १२ ऑक्टोबर १९२९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP