मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
काय अवेळीं साद ?

माधव जूलियन - काय अवेळीं साद ?

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति चन्द्रकान्त]

घालिशीं, काय अवेळीं साद ? ध्रु०

पिका, निबिड ऊत्तुङग माजली अरण्यापरी बाग,
आणि काय तुज होऊनि जाऊ काही स्मरण अगाध ? १
ऊन्च नारळी, चिन्चा यांतुनि नान्दे मौन गभीर,
वेडया, हा पडसाद ऊठे तुज तोच गमे संवाद ! २

आम्रमञ्जरीपरिमळ ऊधळी तो रङगेल वसन्त,
हा हिरवट हेमन्त, कुठे तो वासन्तिक आल्हाद ? ३

शाळुहरभर्‍यावरुनि चावरा ये पूर्वेचा वात,
कोठे ती मधुवायुलहर जी स्फुरवी हृदिं ऊन्माद ? ४

होय तुला भ्रम कसें म्हणावें ? सृष्टिसखा असशी.
करिती बघ निष्पर्ण शिरीषीं शेङगा खुळखुळ नाद. ५

औत्कण्ठेने धीर सोडुनी का करिशी धावा ?
का हा टाहो ‘कुठे कुठे ? चा मागे काही दाद ? ६

अधीर पागल वेडा म्हणुनी जन हसतील तुला,
सहानुभूतीलाहि फुकट रे रडक नित्य मोताद ! ७

पिका, तुझा स्वर ऐठवी विलपित करुणोत्कट हृदयीं
ज्यास चाटुनी गेला पावक जितेपणीं क्रव्याद ८

ता. १ डिसेम्बर १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP