मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
नावेंतील गाणें

माधव जूलियन - नावेंतील गाणें

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति मोहनी]

काय गाऊं ? कोठुनि आणूं तुझी रागदारी ?
तूच गा धरूनि सुकाणूं गीत कष्टहारी, ध्रु०

ललित तरल गीतें गाऊ जिथे राग - राणी
तिथे काय विद्याजड मी बोलूं गे अडाणी ?
रहा गात वागीश्वरि,तू सान्ध्य - भाव - गाणीं -’
सान्जदीप ऊजळे गगनीं, मार वर भरारी ! १

स्वर्ग सलिल चुम्बित रङगे दूर ती प्रतीची,
लीन शान्त होऊनि जाती पहा सलिल - वीची,
लीन शान्त त्यांतच झाडी दाट दों तटींची,
तुझ्या मात्र वसनीं, गानीं लहर चमक मारी. २

सहज गान जीवन तूझें शान्त या दिनान्तीं
यदा वरुण फेकी वरुनी अरुणरागकान्ती,
कष्ट हेंच जीवन माझें, असो नसो शान्ती, -
घरीं ताल तुज वल्हवित मी, भाग्य हेंच भारी ! ३

ता. ७ नोवेम्बर १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP