मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
चल ऊडुनि पाखरा !

माधव जूलियन - चल ऊडुनि पाखरा !

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


चल ऊनि पाखरा, पहा जरा -
किति रम्य पसरली वसुन्धरा ! ध्रु०

चोच तुझ्या चेचींत घालितां
गाढ ऊरीं तुज धरुनि पाळितां
न हो काळ कधि सुखाचा रिता; स्वार्थच पण हा, न हा बरा ! १

कोश फाडुनी कळ्या ऊमलती,
खुल्या अङगणीं मुलें खिदळती,
खुल्या प्रकाशाकडे द्रुतगती पळे खळाळत कसा झरा ? २

ऊब ऊथे तुज मऊ पिसांची,
गोड ओढ जरि या घरिं साची,
पण ही छाया किती दिसांची ? तुझें निळें नभ पक्षधरा ! ३

विहङगमा रे, निज पङखांनी
ऊडुनि विहर यगदुद्यानीं -
सराग गाऊनि जीवन - गानीं अमृत हर रे मनोहरा ! ४

ता. ६ ऑगस्ट १९३३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP