मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
पापाची चलती

माधव जूलियन - पापाची चलती

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति श्यामाराणी]

का पापभीरुता हेंच पाप ?
का सहृदयांस हो नित्य ताप ? ध्रु०

राष्ट्राशीं राहूनि ऐमानी
चढला का हा पूज्य गुणांनी ?
प्रासादाच्या किती कमानी ! महाद्वार तर ऐन्द्रचाप ! १

चुरडी जो बहु कलिका हुङगुनि
जाय न तद्रतिसमाधि भङगुनि,
ऐतर पडति त्यावरीच गुङगुनि भगिनींचे विसरूनि शाप ! २

चित्ता सुन्दर आणि भयङकर
ठार करी मृग सालस सुन्दर,
चोहिकडें मृगयाच निरन्तर ! प्रभु अवघ्यासहि मायबाप ! ३

राज्य करी अनियन्त्रित राक्षस,
क्रान्तिदग्ध तर त्याचा वारस !
नच भरपाऐ नसे जया यश, न्याय सबलतेविण दुराप. ४

विधिनिषेध परि ज्या दीनाशीं
प्राप्त लटकणें त्यासच फाशीं;
मरणोत्तर कां स्तुतिसुमराशी आणि सभ्य हे कां विलाप ? ५

कुणी पाहिले स्वर्गनरक ते ?
नत्य विचारें चित्त चरकतें
तेंच वस्तुसुख भोगूं शकतें, मरणोत्तर तर राख, वाफ ! ६

ता. २६ सप्टेम्बर १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP