मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
संवाद

माधव जूलियन - संवाद

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[अभङग]

जुनें झालें झालें फोल -
काय बोलशी तू बोल ?
रूप सुन्दर बरवें
तूज सुन्दर बरवें
तूज हवें नित्य नवें.
नव्या सोङगाचिया फक्त
पायीं लागणार भक्त
रूपें अनन्त सुन्दर -
बघशील नीट तर.
माझ्या ठायीं तिन्ही काळीं
नान्दे लावण्यनव्हाळी.
वर फेक द्दष्टि क्षण
आकाश हें सनातन
भव्य सुन्दर नवता
देख विभूति तत्त्वतां
ऐसे सगुण निर्गुण
तू न पाहशी ढुङकून
ठेव श्रद्धा तू भाबडी
आहेच मी सवंगडी. १

तुझा चातुरीचा बोल
भगवन्ता, पडे फोल
गप्प करिशी सम्प्रती
आहेच मी मन्दमती
अन्तरींची भूक माझी
गप्प राहीना देवाजी,
दोष मला कां रे आता
तूच जरी बुद्धिदाता ?
चित्र रङगतां आभाळीं
रङगतों मी सन्ध्याकाळीं
चित्रामागील नीलिमा
शान्त गाम्भीर्याची सीमा -
तेथ वेडया या जीवाला
काही दिसेना जिव्हाळा.
पटे ओळख देखून
ऐशी काही दाव खूण,
तूच माझा सवंगडी,
गडया, का रे देशी दडी ? २

ता. १९ ऑगस्ट १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP