माझी ताई
[अभङग]
माझी ताअई, हिरकणी
भूमीवरील चान्दणी
प्राप्त यौवनवैभव
पाय काढीना शैशब
गौर लाडिक या मुखीं
खेळे बाळपण सुखी
आज्ञा प्रेमळ पाळणें
आणि निश्चिन्त खेळणें
चाले वसन्तविलास
खेळे प्रसादाशी आस
पोटीं धरी निशा शान्त
औषा रङगवी दिक्प्रान्त
गेली काल स्मृतीपार
नाही औद्याचा विचार
आजच्या या लाटेवरी
वाललक्ष्मी तू हासरी !
खेळे नेत्रीं कौतूहल
आणि भावना कोमल
स्वामी कैवल्याचा तुला
बघतांच व्हावा खुळा ? १
माझी ताअई तू छकुली
चल खेळूं भातुकली
द्दष्टि कशाला स्तिमित ?
कां हें आश्चर्याचें स्मित ?
भस्म माझ्या केसांवरी
काय त्याची चिन्ता परी ?
माझ्या जीवीं खोल भूक
शमवाया तूच ऐक
तुझ्या बोलाचाच भात
करी शान्त जगतांत
शान्तिहीन दिसन्दीस
जीव होअई कासावीस
ताअई माझी तू धाकुली
माझी औरली माऔली
नको थोर स्वतन्त्रता
दे ग बाळपण अता
दूर करो जग मला
म्हण परी तू आपला
हात धरून ने झणी
मज वैकुण्ठभुवनीं ! २
ता. २६ जुलै १९२४
Translation - भाषांतर
N/A