मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
श्रान्त पान्थास

माधव जूलियन - श्रान्त पान्थास

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति परिलीना]

श्रान्त पान्थ, घडिभर तू ठेव ही हुशारी !
ऐष्टस्थल हाकेवर - चल जरा पुढारीं ! ध्रु०

तूच ऊठ, योग्य न मी देणें तुज हात:
द्युति होऊन तव नयनीं, स्फूर्ति अन्तरांत;
रम्यायति होऊनि मी तुज असें बहात;
चल सखया, निकट अलग सङगति मधु भारी. १

तिमिर विरुनि बघ धुकेंहि विरल होत जाऊ.
खाली खोर्‍यांत पहा श्याम दाट राऊ,
दिनसम्राट पूर्वेने करुनि ये चढाऊ,
हर्षच हा की अशोक हेमरथगुढारीं ! २

धूसर गिरि, पीत माळ, नभीं रङग लाल,
तरुशिखरीं सोनेरी स्मित करी सकाळ,
लागे पथ ऊतरणीस अता सुकर चाल -
ऊक शब्द ऊत्तेजक भाट पिक पुकारी. ३

करवन्दीवर सुमें न, सूक्ष्मगन्धि तारा:
गलितपर्ण पळस फुले अरुणवर्ण सारा:
सहकारहि मोहरुनी मधुर दे ऊशारा;
अब्दान्त न, ये वसन्त चेतनानुसारी. ४

सोडिन मी काय तूज ? गडे सोड भीती !
मी तुझी न झालें तरि काय नसे प्रीती ?
बद्धु करुनि मज व्हावी प्रगति तव कशी ती ?
ऊठ, ऊचल ऊझें, चल मार्ग निज सुधारी. ५

ता. १७ फेब्रुवारी १९२९

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP