मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
माझी बाहुली

माधव जूलियन - माझी बाहुली

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[छन्द भुवनसुन्दर]

नाना, बाहुली माझी
बघा कोनाडयामाजी
तिला पिसांची गादी
तिची रेशमी साडी
तिला जरीचा काठ
बघा राणीचा थाट
शोभे श्रीमन्ती हिला
रङग महालीं निळा
नाही चढेल हट्टी
हिची कोणाशी गट्टी ? १

तोण्ड पाहून लाजे
फूल गुलाबी ताजें
दात कुन्दाच्या कळ्या
गालीं सुन्दर खळ्या
काळे ट्पोर डोळे
भारी लाडिक भोळे
नाक चाफ्याची कळी
ओठ दोन पोवळीं
शब्द दिसती ओठीं
पण अबोल मोठी. २

ठेवा ऐकटी घरीं
धीट आनन्दी परी
थो थो काजळ घाला
नाही पाणी डोळ्याला
निजे पुढयांत माझ्या
कधी वाजेना बाजा
पोर गुणाची खाणी
व्हावी कुणाची राणी ?
हिला आणा ना राजा -
नाना, हासतां का ? जा ! ३

ता. २९ ऑगस्ट १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP