मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
प्रेमळे, जाशिल का सोडून !

माधव जूलियन - प्रेमळे, जाशिल का सोडून !

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति अञ्जनी]

प्रेमळे, जाशिल का सोडून ? ध्रु०

पत्त्यांचा बङगला औभविला,
हलक्या हातें खपुनि सजविला.
जों न अजुनि वर कळस चढविला तोंच तया मोडून - १

ऐक फुलाचें रोप लाविलें,
पाणी दोघांनीहि शिम्पिलें.
परी अवेळीं येती न फुलें म्हणुनि रोप झोडून - २

करूं समस्या म्हणुनी पहिला,
चरण तुवां, मी दुसरा लिहिला,
तिसरा न सुचे तुजला वहिला म्हणुनि लिखित फाडून - ३

स्वैर वावडी हवेमधे ही
ताण विलक्षण सडयास देऐ,
ओढुनि कसची जवळी येऐ ? सूत्र तसें तोडून - ४

ता. १० नोवेम्बर १९२३

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP