मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
वृद्ध भटजी

माधव जूलियन - वृद्ध भटजी

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति मुद्रिका ]

कां औठतां ? बैसा अहो रसिक मण्डळी !
नच कामाची ही घाऊ,
होऊं द्या स्वस्थ या स्थळीं. १

सङकोच भोजनीं गोड परी थोडका;
थकलात तुम्ही पण आम्ही
औठवूंच नये झोड का ? २

छे ! आग्रह मजला नको, अहो, वृद्ध मी:
पक्कान्नें पचवायाची
परि शक्ति न झाली कमी. ३

जीवन्त अजुनि पोटाग रसग्राहिणी,
किति करी पराक्रम मागे
ही रावबाजिच्य दिनीं ! ४

बदलली सृष्टि, सम्पले दिवस आमुचे;
ती षड्रसभक्ती गेली,
विरस हा कुणाला रुचे ? ५

मी चिवटच पिकलें पान चिकटतों द्रुमीं,
अन सोडूनि भरलीं पानें
औठतसां तरुण ना तुम्ही ? ६

मावळते तारे तुम्ही सकाळीं पहा.
ऊजळतों परी गाभारा
मी घृतनन्दादीप हा ! ७

पाश्चात्य पाठ पढणारे राघू खरे !
हा निरशनमहिमा गातां
दुष्काळ म्हणुनि ये बरें. ८

श्लोकोत्तर ‘हरहर महादेव !’ होऊं द्या,
ही पङिक्त - भेट मी माझी
नच चुकवायाचा उद्या, ९

ते गृहस्थ जणु ओखटें घरिंच जेविती,
मज रुचे प्रयोजन जेथे
दक्षिणा पुढे ठेविती. १०

स्थूलता दिसे मजमघे जरी सम्प्रती,
जातांना तुळशीबागीं
परि पाय न हे कम्पती. ११

आमुची अन्नपूर्णाच माऊली मुळी,
रुचिवीर वाग्भटांच्या ती
पेटूं न दे घरीं चुली. १२

भूदेव किती जेवतों तरि न भागतों,
जेवूनि पुन्हा जेवाया
किति दाक्षिण्यें लागतों ! १३

जाहलें ऊकचित्त हां ! ऊठा की तुम्ही !
पडतात कष्ट ऊठतांना
तरि न धरीं मनिं किन्तु मी. १४

ता. २७ डिसेम्बर १९२८

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP