मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
कञ्चनी

माधव जूलियन - कञ्चनी

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति मिश्र : पञ्चकल्याणी व कालचक्र ]

कञ्चनी रसरङगाची खाणी,
शेकडों हृदयांची ही राणी
लागली गावया सहज पाखरावाणी. १

आधिच गोद जनानी गळा
कोवळा खुले, चढे मोकळा,
त्यांतून वश हिला सङगीताच्या कळा. २

साधें गीत किती हृत्सङगी !
साथ करि चुरशीने सारङगी,
घे तान भिङगरीपरी झर्र तन्वङगी. ३
पायीं पैंजण रुमझुमछुमती,
बोलहि थकथय थक्थय औठती,
ध्वनि रम्य अभिनयें  विशद करी ही सुदती. ४

तनू ही सडपातळ गुल्छडी,
घवघवे सुरत पाक फाकडी,
नादांत तरडगें जशी नभाइं वावडी. ५

दावी किति नाचांत चलाखी !
झगमग खेळे मग पोशाखीं,
गिर्कीस विकासे घोळ, झळकती वाकी. ६

कान्ति तर सोनें बावनकशी,
कञ्चुकी नील, साज गुल्बशी,
- औल्काच अवतरे ही किंवा और्वशी ! ७

धीटच, परि भलती भ्रुलीला
न रुचे अशा नृत्यवल्लीला;
या विशाल नयनीं दिसे कलाच सुशीला. ८

दिव्यांचा लखलखाट माण्डवीं.
बायुही गीतगन्ध साठवी;
रङगली किति सभा नृत्यगानलाघवीं ! ९

हृदयें ऐकवटुनि या कालीं
हलती शान्तपणे वरखाली,
पण लाट औसळुनी पडे समेवर टळी. १०

वाहवा ! ऐकुनि किञ्चित लाजे,
गालीं स्मित मघु पुसट विराजे,
किति औजू कुरङगी नजरफेक ही साजे ! ११

वदनीं मुग्ध मधुरता राही,
दावी काय कलाचतुराऐ
भाबडी साबडी सरळ पोरसवदा ही ! १२

अभिनव अविट सुखाची झरी
गुणी तू सुगर रूपसुन्दरी,
कञ्चनी, खचित तू श्रेष्ठ काव्यमञ्जरी ! १३

लोटला शान्तरसाचा मजा,
चन्द्रिका गमशी की सारजा !
फुलूनि झुलविशी कोळपल्या काळजां. १४

कष्टशी अशी हृदयरञ्जनीं,
हीन तव कला, जात का जनीं ?
या कृतज्ञास तू वन्द्य सदा कञ्चनी ! १५

ता. ९ एप्रिल १९२४

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP