मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
आमचें घर

माधव जूलियन - आमचें घर

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[छन्द ओवी]

आमुचें घर छान
शेजारीं वाहे छान
शेजारीं वाहे ओढा
कागदी होडया सोडा
दूर जाती. १

चतूर नव्हे, तर
अभ्रकी पङखांचें तें
विमान औडे तेथे
औन्हामाजी. २

औथळ वाहे पाणी
नितळ थण्डगार
नाचतां त्यांत फार
मौज वाटे. ३

पाहून अङग ओलें
भरते रागें आऐ
मागून देऐ काही
खाऊ गोड. ४

आमुचें घर छान
परसूं लाम्ब रुन्द
मोगरा जाऐ कुन्द
फुलतात. ५

खोबरें झेण्डूंतील
मागतो सदा बाळ
झेण्डूंचा पहा काळ
खोडकर. ६

अडूळशाचीं फुलें
देठांत थेम्ब गोड
करितो गोड तोण्ड
मुलांचें तो. ७

सोलून कोरफड
पाण्यांत धुतां साफ
बर्फ हो आपोआप
काचेवाणी. ८

आमुचें घर छान,
म्हणती आम्हां द्वाड
करिती परी लाड
बाबा आऐ. ९

अङगणीं सारवल्या
खडूने काढूं शिडी
लङगडी चढोवढी
खेळायला. १०

घरांत जिन्याखाली
ताईचें घरकूल
खडयांची थण्ड चूल
पक्वन्नें दे. ११

भाण्डून केव्हा केव्हा
म्हणतो जा ! फू गडी !
लागेना परी घडी
ऐक व्हाया. १२

आमुचें घर सान
आता तें कोठें गेलें ?
बाल्याचें हें भुकेलें
मन पुसे. १३

ता. १४ सप्टेम्बर १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP