मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|माधव ज्युलियन|
माळ - वारा

माधव जूलियन - माळ - वारा

डॉ. माधव त्रिंबक पटवर्धन ऊर्फ माधव जूलियन, (जन्म २१ जानेवारी १८९४; मृत्यु २९ नोव्हेंबर १९३९) हे मराठी भाषेतील प्रतिथयश कवी होऊन गेले.


[जाति हरिभगिनी]

करीत भिरभिर वाहे वारा अखण्ड त्या माळावरती,
मुरमाडांतिल खुरट चेपलीं गवतें तींही थरथरती.
जडभरत परी असङख्य पडले अफाट माळावर गोटे,
त्यांस औपाधि न बाहय जगाची, जीवन्मुक्त पहा मोठे !

नागफणी निवडुङग ऐकटा घालुनि चिल्खत काटेरी
ओसाडीचें राज्य चालवी मरुशान्तीच्या माहेरीं.
रानमाणिकें लेऐनि अङगीं आपुलेंच पुरवी कोड,
हिरव्यावर आरक्त छटा ती तेवढीच दुरुनी गोड !

अफाट माळावरी ऐरव्ही ऐक रङग पिवळा करडा,
होऔनि मग तद्रूप विसावे दगडावर निर्भय सरडा.
माळावर त्या देखा कोठे जीवन मोहक नाहीच -
अफाट पसरे माळ ऐकला दूरवरी औन्नत नीच.

घालायाला शीळ मनोहर तिथे न बेटें बांसाचीं,
छायाकर तरुवेली कुठुनी ? कुठुनी सुमनें वासाचीं ?
न कुठे निर्झर वा पुष्करिणी साथ द्यावया सहकम्पें,
कुठुनि गारवा ? मळ - वाटहि नच कोठे, माळ न हा सम्पे.

चुकला रस्ता वाटसरू तर या माळावर यायाचा,
जगला तर मग विसरायाचा नाही तो अनुभव याचा.
भिरभिरतो परि सदैव वारा, वेडाला येऔनि भरती,
असे का कुठे भग्न - शून्य मग देऔळ त्या माळावरती ?

ता. ११ नोवेम्बर १९२७

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP