मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
तुम्ही कल्पविकल्प सोडा सो...

लावणी १४६ वी - तुम्ही कल्पविकल्प सोडा सो...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


तुम्ही कल्पविकल्प सोडा सोडा हो रावजी सोडा सोडा हो । घ्या प्रेमसुखाचा विडा ॥धृ०॥

सत्रावी नागवेल पान आणली । देठ लल्पना शिरा काढली । चित्तचेतन हा चुना शांती म्या केली । सुपारी विघ्नाची फोडली । भाव वेलदोडा दोडा हो । झणिं म्या पाठविला विडा ॥१॥

सात्त्विक कात निर्मळ, लाल केवळ । बोधभावाचे आणले जायफळ । अष्टपाकुळ कांदळ (?) । त्यामधें खेळे प्राणेश्वर नाभीकमळ । त्या स्थानीं मन जडा जडा हो ॥२॥

कुद (?) लवंग या तिखट । बहु निकट विवेकें धर धरले म्या बळकट । क्षमा केली प्रगट, घातली गांठ । तन्मय केलें म्या बळकट । ज्ञानाचा वर्ख दिला नीट । प्रीतीचा जोडा जोडा हो । झणिं म्यां पाठविला विडा ॥३॥

कवि सिदराम लहेरी कवीश्वर ज्ञानी । भेद विडयाचा गाइला त्यानीं । तुम्ही चतुरसभा चतुरगुणी । ऐका बसुनी, पिंडी प्रचेती पहा शोधुनी । सवाइ राघु फकरूचा जोडा जोडा । झणिं म्यां पाठविला विडा ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP