मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
न्हाण मजला येऊं द्या, बळे...

लावणी १६५ वी - न्हाण मजला येऊं द्या, बळे...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


न्हाण मजला येऊं द्या, बळें कां झोंबतां ? । शेजारीं निजा, दुर कां पळता ? ॥धृ०॥

दिर भाये या घरीं सासुला सांगते । भीड धरली आजवरी मागणें मागते । कुच धरितां या करीं नयनीं निद्रा जागते । प्राण माझा मोहिला कवळुन धरतां ॥१॥

आंतरचे कपटी कांहीं ममता येऊं द्या । मी कांता धाकटी चार महिने जाऊंद्या । रुतुकाळीं शेवटीं फलशोभन होउंद्या । मग भोगा मला तुमची ही ममता ॥२॥

सुगरावा आपुला दाविते त्या घडी । देह अर्पण केला लाखाची घडी । मग भोगावें मला प्रीतीनें आवडी । दासी तुमची ही खरी सरली सरली कथा ॥३॥

रुतु प्राप्त झाला नारीकारण । हाती धरला छ्बेला भोगे प्रीतीनें । गाइ रामा रंदुला, चाहाती शहर पुणें । रंग राखी बरा विठठलाची सत्ता ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP