TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
डाकुरजीने चित्ताजोगा हौसे...

लावणी ९९ वी - डाकुरजीने चित्ताजोगा हौसे...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी ९९ वी
डाकुरजीने चित्ताजोगा हौसेचा जोडा ।
भाग्याची मी मृत पावले, चुकल जन्म चढा ॥धृ०॥
जाण तयारींत, शान फाकडी, निशाण जरीपटका ।
नित्य नवा पोषाक भरजरी, सोनेरी पटका ।
राघुपुढें उभी बनून साळु दक्षण फटका ।
राघुपुढें उभी बनून साळु दक्षण फटका ।
शुभ नक्षत्र मुहूर्त पाहिजे सोन्याची घटका ।
बावनकशीच्या कशीं उतरली भरियली घटका ।
तुकीं उतरले किंचित थोडे, जीव थोडा थोडा ॥१॥
ऐका सख्या शिरताजा आणुन नारी कसणी कसल्या ।
काळ्या सावळ्या गोर्‍या भुरक्या कसा लाऊन कसल्या ।
नावासारखी द्यावी देणगी सोन्याच्या हसळ्या ।
हें समजुन धनी मान्य करावें, कल्पना ठसल्या ।
तुकी उतरले किंचित थोडे जीव थोडा थोडा ॥२॥
मधु मंजुळ कोयाळ टाहो फोडून बोले ।
रसवंतीचें गोड अक्ष्रर कधिं कोणीं केलें ? ।
ज्या झोकावर रावराजेन्द्र पहा कसे डोलविले ।
ठावें नाहीं तुम्हां, पाही, मी नथजडाव ल्याले ।
नाहीं तर उगाच रुसल्या फुगल्या जाणत नाहीं मुढा ॥३॥
प्रसन्न झालों, माग साजणी, पुरविली इच्छा ।
कगन देऊंअ कां देऊं साखळी ? देऊं शाल गुजरातीचा ? ।
कर जोडुनीया उभी सुंदरी, पाय इष्काचा ।
हें समजुन मान्य करावें प्रश्न सदगुरूचा ।
सगनभाऊ जेजुरीचा वागवी ब्रीद नाम तोडा ।
रामा कवीच्या गुणावरती फंदीचा जीव वेडा ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:25.8430000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

अष्टादश

 • वि. अठरा . 
 • ०धान्य पुराण उपपुराण - अठरा धान्यें वगैरे पहा . 
 • ०पदें न. अव . गयाक्षेत्रीं विष्णुपदाजवळ - कश्यप , अगस्ति , क्रौंच , मतंग , कण्व , दधीच , गणेश , कार्तिकेय , ब्रह्मा रुद्र , इंद्र , सूर्य , चंद्र , व आहवनीय , दक्षिण , गार्हपत्य , सभ्य , आवसथ्य , ( हे अग्नि ), या अठरा पदांवर पिंडप्रदान करावें लागतें . हीं अठरा पदें म्हणजे खडकावर पावलाच्या आकृतीचे काळे डाग उमटलेले आहेत . हीं पावलें अति सूक्ष्म दृष्टीनें पाहिल्यासच दिसतात . [ सं . ] 
 • a  Eighteen. 
RANDOM WORD

Did you know?

What is Gotra?
Category : Hindu - Traditions
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.