TransLiteral Foundation
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
राजीवनयना केल्या पैना । श...

लावणी १६३ वी - राजीवनयना केल्या पैना । श...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


लावणी १६३ वी
राजीवनयना केल्या पैना । शरण तुम्हांप्रती आले जी ॥धृ०॥

कुळीवंताची मी थोराची । माझी लाज तुम्हाला जी । खुणमुद्रा बंगल्या आंत । नेसन शालू गुलाबी जी । मशी एकांत करते यात । मज लालडीच्या लाला जी । लाजूं येऊं किती समजावूं ? । ज्योतीसी ज्योत मिळाले जी ॥१॥

लोभ असावा, राग नसावा । किती मरजी संभाळूं जी ? । पूर्ण कृपाळा मज संभाळा । तप्त शरीर जीव जाळूं जी । गेंद गुलाल नखरा केला । नको रुत घटका टाळूं जी । पहा सुगरावा मुखडा दावा । तुज पाहतां मन धालें जी ॥२॥

हे गुणराशी, तुमची दासी । चमकुन या उभी राहते जी । करिते मात हात गळ्यांत, नेत्र भरुनिया पाहते जी । फार वस्त्र या रंगमहालांत । समजावून गृहीं नेते जी । प्रीत असावी, लाज नसावी । चौथा दिवस आज न्हाले जी ॥३॥

किती समजावूं प्राण देऊ । हात गळ्यंत असावा जी । विषयशांती भोग एकांतीं । माझा नखरा पहावा जी । उभयतांची प्रीत रसाची । साजण गृहीं आज यावा जी । रामा गुणी-जन गाती चाहाती चाहाती । धाक पडे गवळ्याला जी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:29.7030000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

आली तार, झाला ठार

  • (कर.) आपल्याकडे तारयंत्र नवीन सुरू झाले तेव्हा सामान्यतः एखादा मनुष्य अत्यवस्थ असला म्हणजे त्याच्या नातेवाईकांस तार करण्याची पद्धती होती. त्यामुळे अशा प्रकारची एखाद्याची तार आली म्हणजे बहुतेक तो गमावला असेच मानीत असत. खेड्यातून अद्यापहि तार आल्यास भितात. 
RANDOM WORD

Did you know?

How do I become a moderator on QnA?
Category : About us!
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.