TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
तुझि तुझि किती म्हणुं ? स...

लावणी १९ वी - तुझि तुझि किती म्हणुं ? स...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.

लावणी १९ वी
तुझि तुझि किती म्हणुं ? सख्या, मजवर कां रुसशी ?
खरें लटकें किती पुसशी ? ॥धृ०॥
प्रीत घडली तुझी माझी तेव्हां सुख विशेष जाहलें ।
आतां हे दिवस कसे आले ? ।
प्रत्यक्ष शिर कापलें तरी मी कांहीं न बोले ।
तरी कां मग देतां झोले ? ।
वेळ अवेळ नाहीं म्हटली निजनिजतां मेलें ।
असे अर्जव तुमचे केले ।
तरी म्हणतां ही लटकी
रुसतां घटकाघटकीं
भोगित फिरतां बटकी
विषयचतुर नेटकी, खरा मम प्रियकर असशी ॥१॥
बहुता दिवशीं भेटले तुला, आनंदमय दोघां
जसा पुर गंगेच्या ओघा ।
कधीं येशी घरीं, कधीं नाही, रस नवती भोगा ।
सख्या, तूं वळवाच्या मेघा ।
अळमळित भाषणें मशिं कशि करितां सांगा ।
जशा पाण्यावरल्या रेघा ।
तिनतिनदां घरीं येतें
लागल तें मी देते
माया लावुन घेते
मनामधें चिंतितें तुझी लागली असोशी ॥२॥
पहिल्यानें चांगलेपणीं रत झाला शेजे ।
आतां कसें वाइटपण साजे ? ।
त्रिविध लोक बोलती मला, तुम्हि घरचे राजे ।
ढोल हा दोहिकडे वाजे ।
फार दिवस भोगिल्यावरी जड वाटे ओझें ।
चालवा घरीं बसल्या माझें ।
उठतां, बसतां स्मरते
मन फिदा तुम्हांवरते
जेव्हां जें हवें तसें करतें
वरवरते मोहुन माझी पाहातां कसोशी ॥३॥
आजपावेतों निभावलें, आतां कशी सोडूं ? ॥
नका हो धड फडकें फाडूं ।
प्राणाची संगतिण तुझ्या, किती ममता जोडूं ? ।
दिनाभरि केवढा वेळ आरडूं ? ।
जें विधिनें भाळीं लिहिलें तें कैसें खोडूं ? ।
उभयतां मन संशय तोडूं ।
निश्चय माझा पाहणें
निर्मळपणीं हो राहणें
मी वेडी, तुम्ही शाहणे ।
होनाजी बाळा म्हणे, प्रीतीची नित्य वर्दळ सोशी ।
तरि जगीं धन्य सखे होशी ॥४॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:20.6570000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

धामधूम

 • f  Uproar, tumult. 
 • स्त्री. १ दंगल ; गोंगाट ; गडबड ; गोंधळ ; अपूर्व प्रकाराने उडालेली खळबळ . २ धुमश्चक्री ; बंडाळी . त्या धामधुमीची नुसती वर्णने ऐकून अंगावर शहारे येतात . - टिले ४ . ४ . १७८ . [ हिं . ] म्ह ० धामधूम बलोका राज . 
RANDOM WORD

Did you know?

gharat javalchi vyakti vaarlya nanter, lok ek varsha san saajre ka karat nahit?
Category : Hindu - Philosophy
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.