मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
स्वप्नीं पुरुष भोगिला हो ...

लावणी १४३ वी - स्वप्नीं पुरुष भोगिला हो ...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.


स्वप्नीं पुरुष भोगिला हो कीं सांगे चित्रलेखेला ।
मूर्त गोजिरी, तनू सावळी दृष्टी ग म्यां पाहिला ।
बाणासुराची कन्या उका होती चतुर पद्मिनी ।
दिव्य कांती सुकुमार स्वरुप अनिवार बत्तीस-लक्षणी ।
रत्नजडित रंग महाल लाल हा बंगला दिला बांधुनी ।
चित्ररेखा उका दोघी होत्या दिवस करमोनी ।
फुलपुष्पांची शेज करोनी निजल्या ग सुखशयनीं ।
स्वप्नीं अवस्था झाली ग भोग दिला अनिरुद्धानी ।
दचकुन उका उठली । पाहे भवतालीं ।
जिवलग जिवाचे ख्याली । टाकुन गेले येकली ।
उठ ग चित्ररेखे, माझ्या जिवीं चुटका लागला ॥१॥
चित्ररेखा पुसे उकेला, काय झालें तुजप्रति ? ।
नटनाटक सुपात्र देखिला पुरुष सगुणमूर्ति ।
तेव्हां चित्ररेखेनें घेतली दौतलेखणी हातीं ।
सप्त तीं द्वीपें नवखंड पृथ्वी लिहिली ग भिंतीवरती ।
शहाण्णव कुळीचे राजे लिहिले पाहुन तर्कामती ।
तेव्हां उकेला हातीं धरुनिया दावी ती तिजप्रती ।
ती म्हणे हात नही करोनी साजणी ।
चित्ररेखा तत्‌क्षणीं साजणी । दावी पाताळ लोक लेहुनी ।
पुढे स्वर्गलोक लिहिले उका म्हणे नाहीं हरि ।
गीर गोला (?) ॥२॥
स्वर्गमृत्युपाताळ तिन्ही ताळ म्या ग लिहिले ।
नाहीं तिच्या मनासी कोणी ग ह्या चित्रामधिं आलें ।
तेव्हा चित्ररेखेनें विचार करून द्वारके लिहिले ।
छप्पन कोटी यादव लिहिले ।
बळीराम काढले लोक अनिरुद्ध चित्रामधिं काढिले ।
हस्तकीं धरून उकेसी ।
दाविले अनिरुद्धासी । आली मुर्छना, पडे धरणीसी ।
तूनू व्याकुळ झाली, कव घालाया गेली चित्राला ॥३॥
प्राण चालला, व्याकुळ झाला, भेटीव ग सखयाला ।
तेव्हां चित्ररेखेनें आकाशपंथ मार्ग लक्षिला ।
पळ घडि न लावतां सहस्र योजन गेली द्वारकेला ।
तसाच पलंग घेऊन आली अनिरुद्धाला ।
तेव्हा उकेला आनंद झाला, सूर्य प्रकाशला ।
जसा पुनवेचा चंद्र उगवला, पलंगीं उठुन बैसला ।
अनिरुद्ध नेत्र उघडून पाहे कामिनी ।
उका चित्ररेखा दोघीजणी हात जोडुनी ।
लागती त्याचे चरणीं ।
तेव्हां प्रद्युम्न पुत्र बोलला, कसें तुम्ही आणिलें मजला ? ॥४॥
मी तुमची वल्लभा प्राणप्रियकरा सगुणभास्करा ।
कर जोडून आर्जविला प्रद्युम्न-पुत्र राज तो हिरा ।
उठा आतां लवलाही, स्नान तुम्ही करा ।
नाना परी पक्वानें करुनी उका वाढी सुंदरा ।
शेज मंचकीं आरास केली फुलपुष्पांची तर्‍हा ।
नेउन बसविला मंचकीं, लावी मोत्यांचा तुरा ।
बहु हर्ष तिचे अंतरीं । भोगविलास नाना परी ।
तो अनिरुद्ध जरवे (?) तरी । राहिला गुंतुन मंदिरीं ।
त्यानंतरा हे कवि करीती चित्रचातुरी खरी ।
सिदराम लहेरी म्हणे असा तो तुरा नवरा कलगीला ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP