TransLiteral Foundation
Don't follow traditions blindly or don't assume a superstition either.
Don't be intentionally ignorant. Ask us!! Make Informed Religious Decisions!!
मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लावणी|अंधारातील लावणी|
काय करूं मेल्या कामाला ? ...

लावणी ३१ वी - काय करूं मेल्या कामाला ? ...

लावणी म्हणजे गीत, नृत्य आणि अदाकारी यांचा त्रिवेणी संगम. लावणी शृंगाराची खाण आणि महाराष्ट्राची शान आहे.

लावणी ३१ वी
काय करूं मेल्या कामाला ? छळितो माला ॥धृ०॥
आले भर नवति दिस उजवाया । झुरझुरझुरते जीव रिझवाया ।
वैरिण रात्रा जाते वाया । आग लाव या धनमाला ॥१॥
न ये निद्रा शेजेवरते । न पडे चैन येकटपणीं असते ।
हुरहुर हुरहुर चहूंकडे दिसते । त्रासते विषयवर्माला ॥२॥
कठिण समय मदनाचा घुटका । मरणप्राय ती संकटघटका ।
नको नको, कधिं होइल सुटका ? व्यर्थच आट कां जन्माला ? ॥३॥
ह्रदयावर जोबन टकटकले । चोर जसे चोळींत अटकले ।
कसे तरी शरिरास चिकटले । टकले आपल्या कर्माला ॥४॥
भोग भोगि मग सुलक्षणी ती । कोण करिला सौख्याची गणती ? ।
होनाजी बाळा धन्यच म्हणती । जाणती स्वकुळ धर्माला ॥५॥

Translation - भाषांतर
N/A

References : N/A
Last Updated : 2016-11-11T12:54:21.3270000

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.

करंगळीवर नाचविणें

 • पूर्णपणे आपल्‍या तंत्राने चालावयास लावणें 
 • पूर्णपणे आपल्‍या कह्यांत आणणें 
 • मुठीत ठेवणें. ‘स्‍वारीला मी करंगळीवर नाचवीन.’ -अस्‍तंभा ११८. 
RANDOM WORD

Did you know?

"Maruti namaskar"
Category : Hindu - Beliefs
RANDOM QUESTION
Don't follow traditions blindly or ignore them. Don't assume a superstition either. Don't be intentionally ignorant. Ask us!!
Hindu customs are all about Symbolism. Let us tell you the thought behind those traditions.
Make Informed Religious decisions.

Featured site

Status

 • Meanings in Dictionary: 644,289
 • Dictionaries: 44
 • Hindi Pages: 4,328
 • Total Pages: 38,982
 • Words in Dictionary: 302,181
 • Tags: 2,508
 • English Pages: 234
 • Marathi Pages: 22,630
 • Sanskrit Pages: 11,789
 • Other Pages: 1

Suggest a word!

Suggest new words or meaning to our dictionary!!

Our Mobile Site

Try our new mobile site!! Perfect for your on the go needs.